तो लोकसंख्येच्या प्रमाणात येणारा रुटीन निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:24 AM2021-08-26T04:24:56+5:302021-08-26T04:24:56+5:30
आ.राऊत पुढे म्हणाले, त्यांना कायम खोटे बोलायची सवय आहे. त्यांना पालिकेतील त्यांचे नगरसेवक सांभाळता येत नाहीत. विकासकामांकडे त्यांचे दुर्लक्ष ...
आ.राऊत पुढे म्हणाले, त्यांना कायम खोटे बोलायची सवय आहे. त्यांना पालिकेतील त्यांचे नगरसेवक सांभाळता येत नाहीत. विकासकामांकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. नगरपालिकेकडून प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री त्यांना मंजुरी देत असतात. मी तिथे सदस्य आहे. अशा प्रकारे चार वर्षांत शेकडो कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आम्ही त्याची माहिती कधी देण्याचा प्रयत्न केला नाही. उगीच मंत्र्यांसोबत फोटो काढून नौटंकी करू नये. हा रुटीन निधी आहे. त्यामुळे तो मी आणला म्हणायचा नैतिक अधिकार त्यांना नाही, असे आमदार राऊत यांनी स्पष्ट केले. यावेळी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, रावसाहेब मनगिरे, नगरसेवक दीपक राऊत, विजय राऊत, विजय चव्हाण उपस्थित होते.
(फोटो : राजेंद्र राऊत)