दिसतो हापूस..! बाजारात आंबा मात्र कर्नाटकाचा अन हैद्राबादचा 

By दिपक दुपारगुडे | Published: March 21, 2023 12:46 PM2023-03-21T12:46:04+5:302023-03-21T12:46:39+5:30

सोलापुरात कोकणचा राजा म्हणून बनावट आंब्याची विक्री 

it seems like hapus but mangoes in the market are from karnataka and from hyderabad | दिसतो हापूस..! बाजारात आंबा मात्र कर्नाटकाचा अन हैद्राबादचा 

दिसतो हापूस..! बाजारात आंबा मात्र कर्नाटकाचा अन हैद्राबादचा 

googlenewsNext

दीपक दुपारगुडे, सोलापूर : तोच रंग, तोच आकार अगदी अस्सल देवगडच्या हापूस आंब्यासारखा पण हापूस मात्र नाही. कर्नाटकातील बनावट हापूस आंबे सोलापूरच्या  बाजारात दाखल झाली आहेत. पण तुम्ही खरेदी करत असलेला आंबा हापूसच आहे का? हे एकदा पडताळून घ्या. कारण हापूसच्या नावाखाली कमी प्रतीचा आंबा देऊन विक्री होत आहे. कर्नाटक हापूस म्हणून ओळखला जाणारा हा आंबा कोकणचा हापूस म्हणून विकला जात असल्यानं ग्राहकांबरोबरोच  शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बाजारपेठांमध्ये हापूस दाखल झाला आहे मात्र कर्नाटक आणि इतर राज्यातील आंबे हापूस विक्री केली जात असल्याचे व्यापाऱ्याने सांगितले.

दुसरीकडे दर कमी मिळत असल्यामुळे सामान्य नागरिक देखील आंबे खरेदी करताना दिसत आहेत. बाजारात कोकणचा राजा अर्थात हापूस आंब्याची देवगड, रत्नागिरी येथून आवक होते. त्याशिवाय कर्नाटकातूनही आंबा येतो. मात्र, दोघांच्या चव आणि सालीमध्ये फरक आहे. कोकणातील हापूस आंबा रसाळ आणि चवीस चांगला असतो. त्यामुळे कोकणातील आंब्यांना सर्वाधिक मागणी असते. म्हणूनच या आंब्याच्या किंमतीही जास्त असतात. २० एप्रिलनंतर आंब्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढेल, ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल इतक्या दरात आंबा उपलब्ध होणार आहे. 

असं ओळखावा अस्सल हापूस?

'अस्सल हापूसला सुगंध असतो. या सुगंधावरुन आपण त्याची पारख करु शकतो. त्याबरोबर त्या आंब्याची साल ही कमी जाडीची आणि पातळ असते. हा आंबा कापल्यानंतर गडद केसरी रंगाचा असतो. तर इतर हापूस हा फिकट रंगाचा असतो. बनावट हापूस आंब्याची साल जाड असते. या प्रकारे ग्राहक अस्सल हापूस आंब्याती पारख करु शकतात.

असे आहेत दर 
बदाम - ४० ते ८०
लालबाग - ६० ते १२० 
हापूस ६००-१२००
कर्नाटक हापूस -४००-६००

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: it seems like hapus but mangoes in the market are from karnataka and from hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.