रात्री आईवर तर पहाटे मुलावर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:17 AM2021-05-03T04:17:32+5:302021-05-03T04:17:32+5:30

मोहोळ : वय ३६. व्यवसाय शेती.. पण कोरोनाची बाधा झाली. उपचारासाठी सोलापूरमधील हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल केले. ही माहिती ...

It is an unfortunate time to bury the mother at night and the child in the morning | रात्री आईवर तर पहाटे मुलावर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ

रात्री आईवर तर पहाटे मुलावर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ

Next

मोहोळ : वय ३६. व्यवसाय शेती.. पण कोरोनाची बाधा झाली. उपचारासाठी सोलापूरमधील हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल केले. ही माहिती मिळताच त्यांच्या ५५ वर्षीय आईने अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी रात्री आईचा अंत्यविधी पार पडला न पडला तोच शनिवारी पहाटे दवाखान्यात मुलगाही मयत झाला. रात्री आईवर, तर पहाटे मुलावर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ पोखरापूर ग्रामस्थांवर आली आहे. आजी अन् वडिलांच्या छायेपासून दुरावलेल्या लहान मुलांचा आक्रोश पाहून ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.

पोखरापूर येथील नितीन दळवे यांचा मूळचा शेती व्यवसाय. पण ती अडचणीत आल्याने सध्या ते इतर ठिकाणी काम करीत होते. ६ दिवसांपूर्वी त्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांना सोलापूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले. याबाबत घरी त्यांच्या ५५ वर्षीय आईला समजताच तिने प्राण सोडला. नातेवाइकांनी शुक्रवारी रात्री रंजना दळवे यांच्यावर अंत्यसंस्कार केला. त्यानंतर शनिवारी पहाटे सोलापुरात उपचार घेत असलेला मुलगा नितीन दळवी मयत झाल्याची बातमी नातेवाइकात धडकली आणि दळवे परिवारावर दु:खाचा डोंगरच कोसळला.

नितीन दळवे यांना पाच वर्षाची आरती, तीन वर्षाची अमृता तर दोन वर्षाची राजनंदिनी अशी तीन मुली आहेत. या तीन मुलींच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले गेले. अंत्यसंस्काराप्रसंगी त्या लहान-लहान मुलींचा आक्रोश पाहून अनेकजणांनी हळहळ व्यक्त केली.

भजनी मंडळांनी घेतले मुलींना दत्तक

आजही माणुसकी जिंवत आहे. हे दाखवून देत मंदिरात विठ्ठल नामाचा जयघोष करणाऱ्या श्री विठ्ठल भजनी व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. शिवाजी रामदास भोसले, ह.भ.प. किशोर कुलकर्णी, दत्तात्रेय ककडे, चंद्रकांत कदम, नानासाहेब उन्हाळे, राजकुमार भोसले व सर्व वारकरी सदस्यांनी गावातीलच सुरेश काकडे यांच्या संकल्पनेतून दळवे परिवारातील त्या तीन मुलीचे पालक बनले. या तिन्ही मुलींचा बारावीपर्यंतच्या शिक्षणाचा सर्व खर्च आम्ही करणार असल्याचे सांगत कोरोना महामारीच्या काळात माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

कोट ::

मागील वर्षी ग्रामीणमध्ये रुग्णवाढीचे प्रमाण कमी होते. परंतु यंदा ते वाढले आहे. ते रोखण्यासाठी सात दिवसांसाठी गाव अत्यावश्यक सेवावगळता पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

- आशिष आगलावे,

उपसरपंच, पोखरापूर

फोटो

०२नितीन दळवे-पोखरापूर

०२रंजना दळवे- पोखरापूर

Web Title: It is an unfortunate time to bury the mother at night and the child in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.