मंदिरात पूजा करणे पडले महागात; दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 10:48 AM2020-05-12T10:48:25+5:302020-05-12T10:48:31+5:30

पंढरपुरातील घटना; पाच पेक्षा अधिक लोक एकत्र आल्याने पोलिसांनी केली कारवाई

It was expensive to worship in the temple; Ten | मंदिरात पूजा करणे पडले महागात; दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मंदिरात पूजा करणे पडले महागात; दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next

पंढरपूर : श्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरी जवळील मल्लिकार्जून महादेव मंदिरामध्ये पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येऊन पूजा केल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल सतीश सर्वगोड, येडी रासकर, फिरोज मणेरी हे पोलिस कर्मचारी पेट्रोलिंग करत होते. यावेळी श्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरी जवळील मल्लिकार्जून महादेव मंदिरामध्ये शैलेश दिलीप संगितराव (वय २७,रा-हरिदास वेस पंढरपूर), ज्ञानेश्वर मारूती अभंगराव (वय ६२, रा. जुनीपेठ, पंढरपूर), विश्वनाथ ज्ञानेश्वर अभंगराव (रा. जुनीपेठ पंढरपूर), वसंत महादेव बुधवंतराव (रा. जुनीपेठ, पंढरपूर), संजय खंडेलवार (रा. इंदिरा गांधी भाजी मार्केट जवळ, पंढरपूर), गजानन पवार (रा. ज्ञानेश्वर मंडपा जवळ नाथ चौक, पंढरपूर), सागर शिंदे (रा. हरिदास वेस पंढरपूर), सागर पवार (रा. बोरावके हाँस्पीटल जवळ पंढरपूर), सुभद्रा संतोष गवळी (रा. मल्लिकार्जून मंदिराशेजारी पंढरपूर), गंगुबाई संजय लवंगकर (रा. कवठेकर गल्ली पंढरपूर) हे  सर्व मंडळी पूजा करत होती. दसरा मंडळांना त्यांनी इतर पोलिसांच्या मदतीने पोलीस ठाण्यात हजर केले.

त्यामुळे वरील सर्वांविरुद्ध पुजा अर्चा करून कोरोना विषाणू संसर्ग पसरु नये याकरीता कोणतेही उपाय योजना न करता पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र जमवून जिल्हादंडाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली.

Web Title: It was expensive to worship in the temple; Ten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.