अंगी हळद लागली... सौंदर्याला बहर आली !
By admin | Published: May 26, 2014 12:26 AM2014-05-26T00:26:06+5:302014-05-26T00:26:06+5:30
शुभलग्न सावधान...: वºहाडी गहिवरले आणि आनंदलेही; सगळं काही भव्य नि दिव्य पण दिसत नव्हतं नवदाम्पत्यांना
सोलापूर : भैरु रतन दमाणी अंध शाळेचा सजलेला परिसऱ़़नातेवाईकांनी केलेली गर्दी़़़नटून, थटून आलेले अंध वधू-वऱ़़पाटावर बसताच ‘अंगी हळद लागली... अणि सौंदर्याला बहर आली़़ ‘लोकमत’च्या ‘चला लग्नाला’ उपक्रमांतर्गत शनिवारी पाच अंध जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडला़ तत्पूर्वी दमाणी नगरातील भैरुरतन दमाणी अंधशाळेत नववधू निर्मला अशोक जाधव (पेवा, ता़ हदगाव, जि़ नांदेड) आणि वर गजेंद्र भागवत गुटाळ (गुरसाळे ता़ पंढरपूर) या जोडप्याला हळद लावण्यात आली़ यावेळी संस्थेचे सचिव संतोष भंडारी, मुख्याध्यापिका सुजाता घोडके, लोकमतचे संपादक राजा माने, सहायक सरव्यवस्थापक रमेश तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती़ या वधू-वराला सहशिक्षिका वंदना कोकीळ, सुरेखा कारंडे, कमलाबाई कोकणे, सरस्वती इंगळे, विजयश्री अंटद यांनी हळद लावली़