म्हणायचे होते जवान, बोलून गेले अतिरेकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 05:15 PM2019-03-25T17:15:24+5:302019-03-25T17:19:01+5:30
रावसाहेब दानवें म्हणाले, पाकिस्तानने आपले ४० अतिरेकी मारले, आपल्या सैनिकांनी त्यांचे ४०० मारले
सोलापूर : पाकिस्तानने आपले ४० अतिरेकी मारले. त्या बदल्यात आपण त्यांचे ४०० अतिरेकी मारले, असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी सोलापुरात केले. दानवे यांना भारतीय सैनिकांचा उल्लेख करायचा होता. पण बोलायच्या ओघात त्यांच्या तोंडून जवान ऐवजी अतिरेकी हा शब्द निघून गेला.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यासाठी दानवे सोमवारी सोलापुरात होते. मेळाव्यात बोलताना दानवे म्हणाले, या देशातील परिस्थिती एक युध्दजन्य परिस्थिती आहे.
या देशात केव्हा काय होईल. भारत आणि पाकिस्तानचे युध्द आपल्याला शमलेलं वाटत असेल पण ते केव्हा भडकेल हे आजच्या परिस्थितीत सांगता येत नाही. पाकिस्ताने आपल्या देशातील ४० अतिरेकी मारले. देशामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. आपल्या देशातील ४० अतिरेकी...सैनिक मारले. याचा बदला घेतला पाहिजे, अशी एक भावना आपल्या देशात निर्माण झाली. या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी शांतपणे विचार केला. तीन दिवसांत आपल्या सैन्यांनी पाकिस्तानात जाउन ४०० अतिरेकी मारले.
दानवे यांच्या वक्तव्याचा एनएसयुआयचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी निषेध केला आहे. भाजपाचे नेते लष्कराच्या बलिदानाचे राजकारण करीत आहेत. भाषणाच्या तोºयात बोलताना दानवे यांना आपण काय बोलतोय हे कळायला हवे होते. त्यांनी माफी तर मागितली नाही. भाजपच्या या मंचावर आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते.
प्रशांत परिचारक यांनी भारतीय सैनिकांबद्दल आणि त्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या अशा आमदाराला सोबत घेऊन फिरणे आणि सैनिकांबद्दल पुन्हा अवमानकारक वक्तव्य करणे यातून भाजपाची विकृत मानसिकता दिसून ेयेते. रावसाहेब दानवे आणि भाजपच्या पदाधिकाºयांचा आम्ही निषेध करीत आहोत. त्यांनी तत्काळ जनतेची माफी मागावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानवे यांचा राजीनामा घ्यावा.