पुन्हा पाऊस बरसणार; ३ व ४ मे रोजी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

By Appasaheb.patil | Published: May 1, 2022 04:25 PM2022-05-01T16:25:42+5:302022-05-01T16:28:46+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

It will rain again; Chance of rain with thunderstorm on 3rd and 4th May | पुन्हा पाऊस बरसणार; ३ व ४ मे रोजी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

पुन्हा पाऊस बरसणार; ३ व ४ मे रोजी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Next

सोलापूर : सोलापूर शहारासोबतच संपूर्ण जिल्ह्यात 3 व 4 मे 2022 रोजी विजांच्या कडकडाट‌ व गडगडाटासह, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान, याच काळात जोरदार वारे (30-40 किमी प्रतितास) वाहणार असून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.

सोलापूर सोबतच पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मागील काही दिवसांपासून सोलापूरच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. सोलापूरचे तापमान एप्रिल महिन्यातच 43 अंश सेल्सिअस वर पोहोचले आहे. वाढत्या उन्हामुळे उकाडा वाढला आहे त्यामुळे सोलापूरकरांची लाही लाही होत असल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: It will rain again; Chance of rain with thunderstorm on 3rd and 4th May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.