सोलापूरातील डॉक्टरांच्या उत्पन्नावर ‘आयटी’ ची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 02:38 PM2018-10-20T14:38:44+5:302018-10-20T14:40:44+5:30

प्राप्तीकर विभागाचे संकेत : दोन छाप्यानंतर सर्च मोहिमेला गती

It's a 'IT' on the income of doctors in Solapur | सोलापूरातील डॉक्टरांच्या उत्पन्नावर ‘आयटी’ ची करडी नजर

सोलापूरातील डॉक्टरांच्या उत्पन्नावर ‘आयटी’ ची करडी नजर

Next
ठळक मुद्देदोन ठिकाणांच्या छाप्यानंतर आय.टी. विभागाच्या सर्च मोहिमेला गती आयकर विभागाच्या वतीने नुकतेच शहर व जिल्ह्यात दोन छापे टाकण्यात आले अचानक झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ

सोलापूर : शहरातील एक नामवंत डॉक्टर व अक्कलकोट तालुक्यात मनिलॅन्डर्स चालवणाºया ज्वेलर्सवर टाकण्यात आलेल्या छाप्यानंतर जिल्ह्यातील प्रतिथयश डॉक्टरांच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स (आय.टी.) विभागाने करडी नजर केली आहे. दोन ठिकाणांच्या छाप्यानंतर आय.टी. विभागाच्या सर्च मोहिमेला गती आली आहे. 

आयकर विभागाच्या वतीने नुकतेच शहर व जिल्ह्यात दोन छापे टाकण्यात आले आहेत. अक्कलकोट शहरातील मनिलॅन्डर्स चालवणाºया ज्वेलर्स दुकानावर टाकण्यात आलेल्या छाप्यात वार्षिक व्यवहारात ३ कोटींची तफावत आढळून आली आहे. शहरातील एका प्रसिद्ध डॉक्टराच्या घरी ८0 लाखांची बेनामी मालमत्ता आढळून आली. दोन्ही ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यात आयकर विभागाच्या वतीने सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. तब्बल दोन दिवस ही सर्च मोहीम सुरू होती. अचानक झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

सोलापूर मेडिकल हब म्हणून ओळखले जात आहे. शहर व जिल्ह्यात अनेक खासगी हॉस्पिटल सुरू आहेत. या हॉस्पिटलमध्ये शेजारच्या कर्नाटक राज्यातील विजापूर, गुलबर्गा, इंडी, बीदर, आळंद आदी भागातून मोठ्या प्रमाणात रूग्ण उपचारासाठी येत असतात. जिल्ह्याशेजारी असलेल्या उस्मानाबाद, लातूर, बीड आदी जिल्ह्यांतूनही अनेक रूग्ण हे उपचारासाठी येत असतात. तालुका पातळीवरही अनेक खासगी हॉस्पिटल आहेत. या सर्व हॉस्पिटलच्या उत्पन्नावर आता आयकर विभागाने नजर वळवली आहे. 
सराफ व्यापाºयांवरही आयकर विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. आयकर कलम १३३ (अ) नुसार आयकर विभागाला सर्व्हे करण्याचा अधिकार आहे. शहर व जिल्ह्यातील संशयित व्यापारी व डॉक्टरांवर ही मोहीम होत आहे. 

गोपनीय मोहीम...
च्आयकर विभागाच्या वतीने अत्यंत गोपनीय पद्धतीने ही मोहीम हाती घेतली आहे. अक्कलकोट येथील सराफ आणि सोलापूर शहरातील डॉक्टरवर करण्यात आलेल्या सर्च माहिमेनंतर आता कोणाचा नंबर लागणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे. आयकर विभागाकडून संशयितांची यादी तयार करण्यात आली असून, दिवाळीपर्यंत ही मोहीम चालूच राहणार आहे. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे यंदाची दिवाळी कोणाकोणाला कडू जाणार याची चर्चा मात्र सर्वत्र रंगत आहे. 

Web Title: It's a 'IT' on the income of doctors in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.