खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 12:56 AM2020-03-22T00:56:10+5:302020-03-22T00:56:30+5:30

एप्रिल २0१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते.

Jaisideshwar Mahaswamy's arrest before MP rejects bail | खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींचा अटकपूर्व जामीन फेटाळला

खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Next

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत बनावट जातप्रमाणपत्र सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी दाखल केलेला अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. पी. आव्हाड यांनी शनिवारी फेटाळला. या प्रकारामुळे सदर बझार पोलिसांना खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एप्रिल २0१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सोलापूरच्या लोकसभा मतदारसंघात बेडा जंगम जातीचे बनावट प्रमाणपत्र जोडून फसवणूक केल्याची तक्रार रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (पी.जी़) प्रदेशाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी सामाजिक न्यायभवन येथील जातपडताळणी समितीकडे केली होती. जातपडताळणी समितीने केलेल्या चौकशीत बेडा जंगम हा जातीचा दाखला बनावट असल्याचे सिद्ध झाले. जातपडताळणी समितीने या प्रकरणी अक्कलकोट तहसीलदारांना न्यायालयात फिर्याद देण्याची सूचना केली होती. अक्कलकोट तहसीलदारांनी सोलापूर न्यायालयात फिर्याद दिली होती. जिल्हा व सत्र न्यायालयात मुख्य न्यायदंडाधिकारी के. पी. जैन देसरडा यांनी सदर बझार पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यावर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणी आम्ही मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करणार आहोत, अशी माहिती अ‍ॅड. संतोष न्हावकर यांनी दिली.

Web Title: Jaisideshwar Mahaswamy's arrest before MP rejects bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.