जालना पोलीस लाठीचार्ज प्रकरण: पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बाळे चौकात चक्काजाम
By संताजी शिंदे | Published: September 3, 2023 12:20 PM2023-09-03T12:20:01+5:302023-09-03T12:20:30+5:30
पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले
संताजी शिंदे, सोलापूर: पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बाळे चौकामध्ये जालना येथील लाठी चार्जचा निषेध करण्यासाठी, सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूकडील रस्त्यावरील वाहतुकीचा चक्काजाम झाला. झालेला लाठी हल्ला हा अन्यायकारक असून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, चेतन नरोटे, पुरुषोत्तम बर्डे, राजन जाधव, मनोहर सपाटे, बिजू प्रधाने, लहू गायकवाड, श्रीकांत डांगे नेते व कार्यकर्ते आंदोलनामध्ये उपस्थित होते. दुपारी बारा वाजता राष्ट्रगीताने आंदोलनाचा समारोप करण्यात आला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.