म्हैसाळ योजनेचे पाणी येताच दोन्ही पक्षांकडून जलपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:21 AM2021-05-15T04:21:04+5:302021-05-15T04:21:04+5:30
आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रसिद्ध प्रमुखांकडून म्हैसाळ योजनेतून सोडलेल्या पाण्याचे पूजनासंदर्भात प्रसिद्ध पत्रक काढले आहे. यामध्ये त्यांनी १९९२-९३ पासून ...
आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रसिद्ध प्रमुखांकडून म्हैसाळ योजनेतून सोडलेल्या पाण्याचे पूजनासंदर्भात प्रसिद्ध पत्रक काढले आहे. यामध्ये त्यांनी १९९२-९३ पासून बंद असलेली मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ योजना केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत राज्यातील एकूण ०७ प्रकल्पांचा समावेश करण्यात आला होता. त्या समाविष्ट यादीत मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा समावेश केला. त्या अनुषंगाने योजना कार्यान्वित होण्यासाठी पंतप्रधानांनी अंदाजे ३ हजार कोटी रुपये मंजूर करून दिले. या योजनेंतर्गत शुक्रवारी मारोळी, जंगलगी, चिक्कलगी, शिरनांदगी येथे पाणी सोडून चाचणी करण्यात येत आहे. या म्हैसाळ योजनेतून सोडलेल्या पाण्याचे पूजन आमदार समाधान आवताडे व आमदार प्रशांत परिचारक यांनी जलपूजन करून ही योजना भाजपने मार्गी लावल्याचा दावा केला आहे.
आमदारकीच्या निवडणुकीत पराभव झालेले भगीरथ भालके यांनी ही जलपूजन केले आहे. सोशल मीडियावरील भगीरथ भालके समर्थक या अकाउंटवरून भगीरथ भालके यांनी मारोळी येथे जलपूजन केल्याचे छायाचित्र व मजकूर टाकून राष्ट्रवादीनेच पाणी प्रश्न सोडविल्याचा दावा केला आहे. स्व.आमदार भारत भालके यांचे दक्षिण भागातील गावांना म्हैसाळचे पाणी मिळावे हे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी श्री विठ्ठल साखर कारखान्याचे चेअमरन भगीरथ भारत भालके यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. जयंत पाटील यांनी म्हैसाळचे पाणी सोडण्याचे आदेश दिले. यामुळे म्हैसाळचे पाणी मारोळी, शिरनांदगी हद्दीतमध्ये दाखल झाले.
एकूणच आमदार आवताडे, परिचारक व भालके यांच्या समर्थकामंध्ये श्रेय वाद सुरू असल्याचे दिसून आले.
फोटो
१४जलपूजन-आवताडे, परिचारक
म्हैसाळ योजनेतून मंगळवेढा तालुक्यात पाणी पोहोचल्यानंतर जलपूजन करताना आ.समाधान आवताडे, आ.प्रशांत परिचारक यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी.
फोटो
ओळी
१४जलपूजन-भालके
म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यात पोहोचल्यानंतर जलपूजन करताना श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके व अन्य पदाधिकारी.