सोलापूर महापालिकेतील जनता दरबार रद्द; सोमवार अन् गुरूवारी भेटणार नागरिकांना आयुक्त
By Appasaheb.patil | Updated: March 9, 2023 19:31 IST2023-03-09T19:30:52+5:302023-03-09T19:31:18+5:30
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दर सोमवारी होणारा एकत्रित जनता दरबार रद्द करण्यात आला आहे.

सोलापूर महापालिकेतील जनता दरबार रद्द; सोमवार अन् गुरूवारी भेटणार नागरिकांना आयुक्त
आप्पासाहेब पाटील, सोलापूर :सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दर सोमवारी होणारा एकत्रित जनता दरबार रद्द करण्यात आला आहे. नागरिकांच्या तक्रारींचे अधिक वेगवान व परिणामकारक निरासन करण्याच्या दृष्टिने यापुढे नागरिकांनी त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आयुक्त शितल तेली-उगले यांना त्यांच्या कार्यालयात आठवड्याच्या दर सोमवारी व गुरुवारी यादिवशी दुपारी ३.३० ते ५.३० या या वेळेत भेटून आपल्या तक्रारी अर्ज स्वत: आयुक्त स्वीकारणार आहेत.
मागील काही दिवसांपासून जनता दरबारातील तक्रारी सुटत नसल्याच्या लोकप्रतिनिधी यांचे म्हणणे होते. शिवाय आठवड्यातून एकच दिवस जनता दरबार असल्याने एकाच दिवशी जास्त तक्रारी येत होत्या. त्यामुळे आयुक्तांनी तक्रारी सोडविण्यासाठी आठवड्यातील दोन दिवस निवडले आहेत. दर सोमवारी व गुरूवारी आयुक्त स्वत- नागरिकांना भेटणार आहेत. तातडीने त्या अर्जावर विचार होऊन त्या अडचणी सोडविण्यात येणार असल्याचे सांगितले. तरी सोलापूर शहरातील नागरिकांना आवाहन आहे की, त्यांनी आपले तक्रारीअर्ज व निवेदन आठवड्याच्या दर सोमवारी व गुरुवारी यादिवशी दुपारी ३.३० ते ५.३० या वेळेत भेटून द्यावे याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेने केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"