हिरवाडीत जावयानं सासऱ्याचा केला पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:22 AM2021-01-20T04:22:55+5:302021-01-20T04:22:55+5:30
करमाळा तालुक्यातील हिवरवाडी ग्रामपंचायतीमध्ये अटीतटीची निवडणूक झाली. वॉर्ड क्र.२ मधून मोहन इवरे व बापूर इरकर या सासरा विरुद्ध जावई ...
करमाळा तालुक्यातील हिवरवाडी ग्रामपंचायतीमध्ये अटीतटीची निवडणूक झाली. वॉर्ड क्र.२ मधून मोहन इवरे व बापूर इरकर या सासरा विरुद्ध जावई अशी चुरशीची लढत झाली. जावई बापू इरकर यांनी सासरा मोहन इवरे यांचा ३३ मताने पराभव करून सासऱ्यास धोबीपछाड केले, तर आळजापूर ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा चुरशीची निवडणूक झाली. आळजापूर गावात स्व:खर्चातून मूृलभूत सोयी उपलब्ध करून दिल्याने मतदारांनी संजय रोडे व त्यांच्या आई पार्वती रोडे या मायलेकरास विजयी करून ग्रामपंचायतीमध्ये काम करण्याची संधी दिली आहे.
---
एक मत लाख मोलाचे
हिवरवाडी ग्रामपंचायतीमधील वॉर्ड क्र.२ मध्ये शतवारी इवरे व वैशाली इरकर या दोघींत अटीतटीची व चुरशीची निवडणूक झाली. मतमोजणीच्या वैशाली इरकर यांना ९२ मते तर शतावरी इवरे यांना ९१ मते मिळाली. वैशाली इरकर या अवघ्या एका मताने विजयी झाल्या. एका मताचे मोल काय असते ते मतदार व उमेदवारांना निकालानंतर समजले.
फोटो ओळी : १९करमाळा-हिवरवाडी
आळजापूर ग्रामपंचायतीमध्ये विजयी झालेले अशोक रोडे व त्यांच्या मातोश्री पार्वती रोडे.
---