जयसिध्देश्वर महाराज आता मराठीऐवजी हिंदीतून भाषण देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 03:03 PM2019-04-02T15:03:57+5:302019-04-02T15:18:29+5:30
बोलणारा देव मीच वादाचा परिणाम; निकटवर्तीय म्हणाले, हिंदीतूनच बोलतील
सोलापूर : भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिध्देश्वर महाराज यांनी मंगळवारी सकाळी सोलापूरकरांशी हिंदीतून संवाद साधला. ह्यबोलणारा देव मीचह्ण असे वक्तव्य अंगाशी आल्यामुळे त्यांनी मराठीऐवजी हिंदीला प्राधान्य देण्यास सुरुवात केल्याचे त्यांच्या निकटवतीर्यांकडून सांगण्यात आले. मोहोळ तालुक्यात झालेल्या दौºयातही त्यांनी हिंदीतून संवाद साधण्यास प्राधान्य दिले.
डॉ. जयसिध्देश्वर महाराज यांनी मंगळवारी सकाळी सात वाजता भुईकोट किल्ल्यातील खंदक बागेत हरळी प्लॉट योगासन मंडळाच्या सदस्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हिंदीतून संवाद साधला. महाराजांनी मराठीतून बोलावे, अशी विनंती काही लोकांनी केली. त्यावर त्यांच्या सहकाºयांनी महाराज आता हिंदीतूनच बोलतील, असे सांगितले.
महाराज म्हणाले, हरळी प्लॉट सदस्यांच्या कायार्तून मी प्रेरणा घेउन जाईन. कई साल पहले ही मुझे आना चाहिए था. आपका ड्रेस कोड भी बहुत बढिया लगा, असे सांगितले. त्यावर एका सदस्यने इस बात पें तलियाँ हो जाय... असा शब्द उच्चारला आणि लोकांनी टाळ््या वाजविल्या. महाराज पुढे म्हणाले, मी यापूर्वी मीराबाई, कबीराचे दोहे, भगवत्गीता, रामायण, महाभारत या विषयावर प्रवचन दिले आहे. तीन वर्षांपूर्वी अफजलपूर तहसीलमध्ये कुराणावरही प्रवचन दिले आहे.