जयहिंद शुगर दोन हप्त्यात एफआरपी पूर्ण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:41 AM2021-03-13T04:41:37+5:302021-03-13T04:41:37+5:30
जयहिंद शुगरच्या ६ व्या गळीत हंगाम सांगता समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बब्रुवान माने-देशमुख यांच्या हस्ते गव्हाणीचे पूजन करण्यात ...
जयहिंद शुगरच्या ६ व्या गळीत हंगाम सांगता समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बब्रुवान माने-देशमुख यांच्या हस्ते गव्हाणीचे पूजन करण्यात आले.
गणेश माने-देशमुख म्हणाले, चालू गळीत हंगामात शेतकऱ्यांनी जो विश्वास जयहिंद कारखान्यावर दाखविला, तो तसाच वृद्धिंगत ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपल्या कारखान्याची शासकीय संस्थाकडून विविध प्रकारची येणे रक्कम जवळपास ३८.०० कोटी रुपये इतकी आहे. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांची आर्थिक अडचण, शेतीची कामे तसेच कौटुंबिक व इतर तातडीची कामे लक्षात घेता चालू गळीत हंगामातील प्रति टन २१०० प्रमाणे ऊस बिलापैकी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना पहिला ॲडव्हान्स हप्ता त्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा करीत आहोत, निधी उपलब्धतेनुसार दुसरा हप्ता इतर खर्च व देणी थांबवून प्राधान्याने शेतकऱ्यांना देण्यात येईल. तसेच चालू १ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान उशिराने गाळपास आलेल्या उसास प्रति टन २२०० रुपयांप्रमाणे व १८ फेब्रुवारीचे पुढील उसास प्रति टन २३०० रुपयांप्रमाणे ऊस बिल देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.