जेसीबीद्वारे पथदिवे फोडणाऱ्यांचा लागला छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:29 AM2021-09-10T04:29:26+5:302021-09-10T04:29:26+5:30

मोहोळ : शहरात नगर परिषदेच्या मुख्य रस्त्यावरील पथदिवे जेसीबीच्या साह्याने पाडणाऱ्या आरोपींचा छडा लावण्यात मोहोळ पोलिसांना पाच महिन्यांनी यश ...

JCB cracks down on street light breakers | जेसीबीद्वारे पथदिवे फोडणाऱ्यांचा लागला छडा

जेसीबीद्वारे पथदिवे फोडणाऱ्यांचा लागला छडा

Next

मोहोळ : शहरात नगर परिषदेच्या मुख्य रस्त्यावरील पथदिवे जेसीबीच्या साह्याने पाडणाऱ्या आरोपींचा छडा लावण्यात मोहोळ पोलिसांना पाच महिन्यांनी यश आले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीचा रोहित ऊर्फ अण्णा अनिल फडतरे, संतोष जनार्दन सुरवसे, आकाश ऊर्फ गोटू नामदेव बरकडे, संदीप ऊर्फ रमेश सरगम सरवदे, अमर राजेंद्र कसबेकर, माजी नगरसेवक रूपेश हिरालाल धोत्रे व जेसीबी मालक लखन नागनाथ साळुंके (सर्व रा. मोहोळ) अशी संशयित आरोपी म्हणून नावे निष्पन्न झाली आहेत.

पाेलीस सूत्राकडील माहितीनुसार मोहोळ नगर परिषदेने मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी पथदिवे लावले आहेत. १ मार्च २०२१ रोजी नगर परिषद कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावर चार पथदिवे काही संशयितांनी पाडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. याप्रकरणी नगर परिषदेचे कनिष्ठ विद्युत अभियंता राजकुमार सपाटे यांनी मोहोळ पोलिसात १ एप्रिल रोजी फिर्याद दिली होती. तेंव्हापासून मोहोळ पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. दरम्यान, हे पथदिवे लखन नागनाथ साळुंखे याच्या जेसीबीच्या साह्याने पाडले गेले असल्याची माहिती ८ सप्टेंबर रोजी मोहोळ पोलिसांना मिळाली. त्यानुसार तपास अधिकारी विजय माने यांनी लखन साळुंके यास ताब्यात घेऊन गुन्ह्यात वापरलेले जेसीबी जप्त केले. हे कृत्य त्याने अण्णा फडतरे, संतोष सुरवसे, आकाश ऊर्फ गोटू बरकडे, संदीप ऊर्फ रमेश सरवदे, अमर कसबेकर, रुपेश धोत्रे यांच्या सांगण्यावरून केल्याचे पोलिसांना सांगितले.

आरोपींविरोधात विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक फौजदार विजय माने करीत आहेत.

Web Title: JCB cracks down on street light breakers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.