साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या जीपचा अपघात; चार जण जागीच ठार

By Appasaheb.patil | Published: December 27, 2023 09:34 AM2023-12-27T09:34:37+5:302023-12-27T09:35:03+5:30

या अपघातात चारचाकी वाहनातील आठपैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना एक जण दगावला आहे.

Jeep accident Four people died on the spot | साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या जीपचा अपघात; चार जण जागीच ठार

साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या जीपचा अपघात; चार जण जागीच ठार

 नासीर कबीर 

करमाळा : आज बुधवार २७ डिसेंबर 2023 रोजी पहाटे करमाळा तालुक्यातील पांडे गावानजीक फिसरे रस्त्याला कंटेनर आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चारचाकी वाहनातील आठपैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना एक जण दगावला आहे.

दरम्यान, घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातील गुलबर्गा येथील भाविक सालसेकडून तवेरा गाडी क्र. के.ए. ३२- एन. ०६३१ ने शिर्डी येथे दर्शनासाठी निघाले होते तर कंटेनर क्र. आर.जे. ०६ जी.सी. २४८६ हा फरशी घेऊन करमाळ्याकडून सालसेच्या दिशेने निघाला होता. पहाटे पावने सहा ते सहाच्या सुमारास पांडे गावच्या पुलाजवळील वळणावर या गाड्यांची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला तर तवेरा गाडी रस्त्याच्या खाली उपडी पडली. अपघाताचा आवाज येताच पांडे गावातील युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर चारचाकी एका अंगावर करून जखमींना बाहेर काढले. प्रसंगावधान राखून या युवकांनी रुग्णवाहिका आणि पोलिसांना पाचारण करून मदतकार्य सुरू ठेवले.
या अपघातात श्रीशैल चंदेशा कुंभार (वय-५६, गुलबर्गा), शशिकला श्रीशैल कुंभार (वय-५०, गुलबर्गा) आणि ज्योती दिपक हुवशालमठ (वय-३८, बागलकोट) यांचा जागीच मृत्यू झाला तर शारदा दिपक हिरेमठ (वय-७०, हुबळी) यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.

सदर अपघातात  गाडी ड्रायव्हर श्रीकांत राजकुमार चव्हाण (वय-२०, गुलबर्गा) हा किरकोळ जखमी झाला असून केवळ आठ महिन्यांचा चिमुकला सुखरूप बचावला आहे तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.

Web Title: Jeep accident Four people died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.