जीपला धडक देऊन कंटेनर थेट घरात घुसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:23 AM2021-05-07T04:23:25+5:302021-05-07T04:23:25+5:30
राहुलकुमार टीक (रा. महूद, ता. सांगोला) व दादा दळवी (रा. लवंग, ता. माळशिरस), तर रंजना धनाजी खांडेकर, वैशाली ...
राहुलकुमार टीक (रा. महूद, ता. सांगोला) व दादा दळवी (रा. लवंग, ता. माळशिरस), तर रंजना धनाजी खांडेकर, वैशाली रामचंद्र खिलारे व प्रतीक्षा अनंत खांडेकर (रा. महूद-दत्तनगर, ता. सांगोला) अशी जखमींची नावे आहेत. कंटेनरने स्कार्पिओला जोराची धडक देताच एअर बॅग्स मोकळ्या झाल्याने दोघांना किरकोळ दुखापत झाली. तर घराच्या भिंतीमुळे सुदैवाने तिघी वाचल्या. या अपघातात स्कार्पिओ व घराचे असे सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. अपघातानंतर कंटेनर चालक व क्लिनर दोघेही पळून गेले.
महूद येथील राहुलकुमार टीक व मित्र दादा दळवी हे स्कार्पिओमधून (क्र. एमएच ४५ एएल २१२२) सांगोल्याकडून महूदकडे येत होते, तर अकलूजकडून महूदमार्गे सांगोल्याच्या दिशेने कंटेनर (डीडी ०३/एल ९७१६) जात होता.महाजन फाट्यानजीक चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरने प्रथम समोरून येणाऱ्या स्कार्पिओला जोराची धडक दिली.
अपघात इतका विचित्र होता की, खांडेकर यांच्या घरातील महिला दैव बलवत्तर म्हणून बचावल्या. धनाजी खांडेकर यांनी वेळ आली, पण काळ नव्हता असे माध्यमांशी बोलताना सांगितले. याबाबत राहुलकुमार टीक याने फिर्याद दाखल केली. संशयित कंटेनरचालक रघुनाथ विठ्ठल गवंड (रा. हातीद, ता. सांगोला) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक अभिजित मोहोळकर करीत आहेत.
----
दैव बलवत्तर तिघी बचावल्या
सुसाट सुटलेला कंटेनर थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या धनाजी खांडेकर यांच्या घराची भिंत पाडून घरात घुसला. यावेळी मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी रस्त्यावर धाव घेतली. त्यावेळी कंटेनरच्या धडकेने भिंतीच्या विटा अंगावर पडल्याने महिला आरडाओरड करू लागल्या होत्या. त्यांच दैव बलवत्तर म्हणून तिघी बचावल्या.
-----
०६सांगोला-ॲक्सीडेंट
भरधाव कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटून कंटेनर घरात घुसल्याचे छायाचित्र.