१३ हजारच्या गुटख्यासह अडीच लाखाची जीप जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:21 AM2021-05-16T04:21:11+5:302021-05-16T04:21:11+5:30
पोलीस उपनिरीक्षक संदेश नाळे हे १२ मे रोजी कटफळ हद्दीतील अचकदाणी येथे पेट्रोलिंग करीत असताना हसन महंमद मुलाणी ...
पोलीस उपनिरीक्षक संदेश नाळे हे १२ मे रोजी कटफळ हद्दीतील अचकदाणी येथे पेट्रोलिंग करीत असताना हसन महंमद मुलाणी हा एमएच ४५/ एन ९२८६ या जीपमधून पानमसाला व इतर तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करताना संशयस्पदरीत्या मिळून आला. यावेळी पोलिसांनी जीपमधून २ हजार ७६० रुपयांचा सुपरजेम पानमसाला, ५ हजार ६४० रुपयांचा विमल पानमसाला, १ हजार ५०० रुपयांची व्ही १ सुगंधित तंबाखू, २ हजार ७०० रुपयांची एम. सुगंधित तंबाखू, ३१५ रुपयांची एस. ९९ सुगंधित तंबाखू असा १२ हजार ९१५ रुपयांचा गुटखा व २ लाख ५० हजार रुपये किमतीची जीप असा सुमारे २ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी हसन महमंद मुलाणी (रा. अचकदाणी, ता. सांगोला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.