जेऊरची पोरं हुशार, २१ विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:22 AM2021-09-25T04:22:14+5:302021-09-25T04:22:14+5:30
अध्यक्षस्थानी यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील हे होते. या कार्यक्रमास दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव माया झोळ, वर्षा ...
अध्यक्षस्थानी यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील हे होते. या कार्यक्रमास दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव माया झोळ, वर्षा करंजकर, ज्योती पाटील, राजकुवर पाटील, प्राचार्य केशव दहिभाते, मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, नवनाथ नाईकनवरे आदी उपस्थित होते. स्वरा निर्मळ, सृजन घाडगे, मुग्धा डांगे, अनुष्का जाधव, आयुष जाधव, आदिती कानगुडे, साक्षी माळवे, निवृत्ती हेळकर या विद्यार्थ्यांची महाराष्ट्रात निवड झाली आहे. त्याचप्रमाणे पलक बलदोटा, गिरीषा मुथा, सई नलवडे, नंदिनी कानगुडे, तन्मय सरडे, शौनक दुधाळ, मधुरा डांगे, रीधा फकीर ,नमन दोशी, वेदांती निमगिरे, रिहान शेख, चैत्राली मंडलेचा, अतिथी मुंगूसकर या विद्यार्थ्यांनीही यश संपादन केले आहे. नितीन पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर अंकिता वेदपाठक यांनी आभार मानले.
..
फोटो ओळी : प्रोॲक्टिव्ह समर स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत गणेश करे-पाटील, माया झोळ, वर्षा करंजकर, ज्योती पाटील, आदी उपस्थित होते.
.........
फोटो २४जेऊर