झळ सोसली; आता तिसऱ्या टप्प्यात अतिवृष्टीचा अकरा कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:22 AM2021-03-25T04:22:04+5:302021-03-25T04:22:04+5:30

मोहोळ तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतीपिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले होते, तर महापुरामध्ये जनावरे वाहून गेली होती. मोहोळ प्रशासनाकडून नुकसानीचे ...

झळ सोसली; Now in the third phase, a fund of Rs | झळ सोसली; आता तिसऱ्या टप्प्यात अतिवृष्टीचा अकरा कोटींचा निधी

झळ सोसली; आता तिसऱ्या टप्प्यात अतिवृष्टीचा अकरा कोटींचा निधी

Next

मोहोळ तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतीपिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले होते, तर महापुरामध्ये जनावरे वाहून गेली होती. मोहोळ प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे शासनस्तरावर सादर केले होते. या नुकसान भरपाईपोटी पहिल्या टप्प्यात शेती नुकसानीसाठी १७ कोटी रुपये, तर मृत झालेले तसेच वाहून गेलेल्या जनावरांसाठी आणि महापुराचे पाणी घरात घुसून झालेल्या नुकसानीपोटी कोटी ४ कोटी रुपये असे एकूण २१ कोटी रुपयांचा निधी मोहोळ तालुक्यासाठी प्राप्त झाला होता. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ३६ गावांसाठी शेती नुकसानीपोटी १७ कोटी ३० रुपयांचा निधी प्राप्त झाला होता.

दरम्यान

तिसऱ्या टप्प्यात १५ गावांसाठी १० कोटी ९१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

तालुक्यात आतापर्यंत तीन टप्प्यांमध्ये ४९ कोटी २१ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.

तिसऱ्या टप्प्यात शेती पिकांच्या नुकसानीसाठी मोहोळ तालुक्याला १० कोटी ९१ लाख रुपये निधी मिळाला आहे. ११ हजार ६२० शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा केले आहेत.

यामध्ये शेटफळ, सिद्धेवाडी, तेलंगवाडी, वाफळे, आष्टी, बैरागवाडी, कुरणवाडी (आष्टी), येवती, यावली, टाकळी सिकंदर, वरकुटे, तांबोळे, पोखरापूर, कुरुल, खुनेश्वर या १५ गावांचा समावेश आहे. या गावातील ११ हजार ६२० शेतकऱ्यांचा समावेश असल्याचेही तहसीलदार बनसोडे यांनी सांगितले.

वंचित गावांना चौथ्या टप्प्यात मिळणार निधी

मोहोळ तालुक्यातील पेनूर मंडलमधील सहा गावांना चौथ्या टप्प्यामध्ये ७ हजार ६२३ शेतकऱ्यांना ५ कोटी ७८ लाख रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये पेनूर मंडलमधील पेनूर, कोन्हेरी, सारोळे, खंडाळी, पापरी, पाटकूल या गावांतील सुमारे ७ हजार ६२३ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

Web Title: झळ सोसली; Now in the third phase, a fund of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.