मुख्याध्यापक संघाच्या विद्या सचिवपदी जितेंद्र पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:16 AM2021-06-03T04:16:50+5:302021-06-03T04:16:50+5:30
सोलापूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाची कौन्सिल ...
सोलापूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाची कौन्सिल बैठक नुकतीच पार पडली. यात महामंडळाच्या विद्या सचिवपदी जितेंद्र पवार, पुणे विभाग अध्यक्षपदी श्रावण बिराजदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
महामंडळाचे प्रभारी अध्यक्ष जळगावचे जे.के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाची सभा पार पडली. महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाष माने (सोलापूर) यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित करण्यात आली. या समितीमध्ये महामंडळाचे माजी सचिव अरुण थोरात (पुणे), यू.जी. पाटील (जळगाव), चिंतामणी तोरस्कर (सिंधुदुर्ग) यांचा समावेश होता. महामंडळाचे नूतन अध्यक्ष म्हणून जे.के. पाटील (जळगाव), विद्या सचिव म्हणून जितेंद्र पवार (सोलापूर ), पुणे विभाग अध्यक्ष श्रावण बिराजदार ( सोलापूर ) महामंडळाच्या सदस्यपदी जिल्हा प्रतिनिधी रंगसिद्ध दसाडे (सोलापूर), पदसिद्ध सदस्यपदी जिल्हा अध्यक्ष तानाजी माने (सोलापूर) यांची निवड करण्यात आली. महामंडळाचे तत्कालीन सचिव आदिनाथ थोरात, शिवाजीराव किलकिले, हणुमंत कुबडे, व्ही.व्ही. पाटील, एम.जी. मातोंडकर उपस्थित होते.
---
०२ जितेंद्र पवार
०२ श्रावण बिराजदार