सोलापूरमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासह नोकरीची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:28 AM2021-08-18T04:28:20+5:302021-08-18T04:28:20+5:30

सर्टिफिकेट कोर्स इन ग्राफिक डिझाईन - ६ महिने कालावधी, सर्टिफिकेट कोर्स इन - ६ महिने कालावधी, डिप्लोमा इन ग्राफिक ...

Job opportunity with international course for the first time in Solapur | सोलापूरमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासह नोकरीची संधी

सोलापूरमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासह नोकरीची संधी

Next

सर्टिफिकेट कोर्स इन ग्राफिक डिझाईन - ६ महिने कालावधी,

सर्टिफिकेट कोर्स इन - ६ महिने कालावधी, डिप्लोमा इन ग्राफिक डिझाईन - १ वर्षे कालावधी, डिप्लोमा इन ३ डि ॲनिमेशन -१ वर्षे कालावधी,

डिप्लोमा इन VFX- १ वर्षे कालावधी,

डिप्लोमा इन वेब डिझायनिंग अँड डेव्हलपमेंट - १ वर्ष कालावधी,

विद्यार्थ्याच्या करिअरसाठी आंतरराष्ट्रीय संधी मिळाव्यात म्हणून किर्ती कॉम्प्युटरतर्फे Adobe & Aoutodesk च्या परीक्षांची तयारी करून घेतली जाते. मर्यादित प्रवेश असलेल्या किर्ती कॉम्प्युटरमध्ये विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते. त्यासाठी १ शिक्षक १० विद्यार्थीप्रमाणे कायम ठेवले आहेत. सोलापूर शहरात ॲनिमेशनचे कोर्सेस सुरू करणारी किर्ती कॉम्प्युटर ही पहिली संस्था आहे. अगदी सुरुवातीच्या काळातील संस्था असून २१ वर्षांपासून आपल्या सोलापूरमधील विद्यार्थ्यांना चांगल्या रोजगाराची संधी देणारी अग्रगण्य संस्था म्हणून पुढे आली आहे. NSDCच्या मीडिया आणि एंटरटेनमेंटच्या अहवालानुसार २०२१पर्यंत ११ लाख ७४ हजारांहून अधिक मनुष्यबळ निर्मितीचे उद्दिष्ट आहे, असे असूनही या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. एकूणच उद्योग जगताला मनुष्यबळाची प्रचंड गरज भासते, स्वाभाविकपणे या क्षेत्रात रोजगाराच्या खात्रीशीर संधी आहेत. एकीकडे असे असताना पारंपरिक शिक्षणापासून मिळणाऱ्या करिअरच्या संधीमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. ॲनिमेशन म्हणजे केवळ कार्टून, चित्रपट वा जाहिराती असा बहुतांश लाेकांचा समज बनलेला आहे. खरे तर ॲनिमेशन तंत्राचा वापर आरोग्य, इंजिनिअरिंग, वाहन, उद्योग, कारखानदारी, शिक्षण, विज्ञान अशा सर्वच क्षेत्रात होत आहे.

सादरीकरणासाठी तंत्रज्ञानाचा म्हणजे ॲनिमेशन, ग्राफिक डिझाईन आणि VFX प्रणालीचा वापर करण्यात येतो. लॉकडाऊनच्या काळातदेखील किर्ती कॉम्प्युटरने आपल्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक्रम ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सुरू केले आहेत. आमच्या येथे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सोलापूर, पुणे, मुंबई आणि हैदराबाद येथे इंटरर्नशिप आणि जॉबची सुविधा केलेली आहे. नव्याने या क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेने माहितीसाठी सेमिनार आयाेजित केला आहे.

संपक :- श्री किर्ती कॉम्प्युटर्स, १९३, किल्ला रोड, नवी पेठ, लोकमंगल बँकेवर, सोलापूर. अधिक माहितीसाठी संपर्क क्र.: ८८८८४१३६६०, ९३०७९८१४०५. www.shreekeertitech.com

Web Title: Job opportunity with international course for the first time in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.