उजनीच्या पाण्यावरून इंदापूर तालुक्यात जोडे मारो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:27 AM2021-04-30T04:27:45+5:302021-04-30T04:27:45+5:30
: उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यात नेल्याच्या निषेधार्थ साेलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून ...
: उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यात नेल्याच्या निषेधार्थ साेलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून त्यांच्या पुतळ्याचे उजनी धरणात विसर्जन करणारे शेतकरी नेते अतुल खुपसे -पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारत इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने बेलवंडी येथे गुरुवारी सकाळी ११ वाजता निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत निंबाळकर,राष्ट्रवादी सोशल मीडियाचे उपाध्यक्ष करण काटे, काकासाहेब जाधव, दादा यादव, अभि यादव, माऊली काटे, पवन जामदार, अक्षय कदम, परशुराम सावंत, सुमित जगताप, सूरज कदम, धीरज निंबाळकर, सौरभ कदम, सागर गायकवाड, ओंकार पवार, जावेद मुलाणी, अभिजित खुटाले, आकाश जामदार, गणेश मुळीक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.