सोलंकरवाडीतील तो हिंस्र प्राणी तरसच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:20 AM2021-04-05T04:20:04+5:302021-04-05T04:20:04+5:30
सोलंकरवाडी परिसरात भांगिरे-शेंडगे वस्ती जवळ अर्जुन भांगिरे यांची शेती आहे. रात्रपाळीची वीज असल्याने भांगिरे हे विद्युतपंप सुरु करण्यासाठी शेतात ...
सोलंकरवाडी परिसरात भांगिरे-शेंडगे वस्ती जवळ अर्जुन भांगिरे यांची शेती आहे. रात्रपाळीची वीज असल्याने भांगिरे हे विद्युतपंप सुरु करण्यासाठी शेतात गेले होते. रात्री ११.३० च्या सुमारास डाळिंबीच्या बागेलगत केळीच्या झाडांजवळ एक हिंस्र प्राणी आणि त्याची दोन पिल्ले दिसली. त्यांना पाहताच भांगिरे यांनी आरडाओरड केली. त्यांच्या ओरडण्याने आजूबाजूचे शेतकरी गोळा झाले. बॅटरीच्या प्रकाशात शोधाशोध केली. परंतु आरडाओरड केल्याने त्या प्राण्यांनी तेथून पळ काढला.
याबाबत वनविभागाला कळविताच रविवारी सकाळी वनविभागाचे अधिकारी पथकासह परिसराची पाहणी केली. केळीच्या झाडाजवळील चिखलामध्ये हिंस्र प्राण्यांच्या पावलांच्या ठशांवरून तो कोणता प्राणी आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
कोट :::::::::::
सोलंकरवाडीत हिंस्र प्राणी निदर्शनास आल्याचे शेतकऱ्यांनी कळविले. मात्र तो तरसही असू शकतो. परंतु या प्राण्याला पाहून घाबरुन जाण्याचे कारण नाही. नागरिकांनी दक्षता घ्यावी. वनविभागाच्या संपर्कात रहावे.
- सुरेश कुरले
मोहोळ वन विभाग