आत्ताच निघालोय.. मेडिकलला चाललोय, चिठ्ठी घरी विसरलीय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:23 AM2021-05-20T04:23:34+5:302021-05-20T04:23:34+5:30
कुर्डूवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत परिसरातील ३६ गावे आहेत. त्यासाठी येथील पोलीस ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक, एक ...
कुर्डूवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत परिसरातील ३६ गावे आहेत. त्यासाठी येथील पोलीस ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक पन्नास-साठ पोलिसांचा स्टाफ आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांची संख्या पाहता कमी पोलीस बळावर येथील अधिकाऱ्यांना काम भागवावे लागत आहे.
कोरोनाच्या काळात तरी कोणी फसवून बाहेर पडू नये, नाहीतर तुम्हीच स्वतः फसून घरातील सदस्यांनाही या महामारीत धोक्यात घेऊन जाल असे आवाहन पोलीस निरीक्षक गोरख गायकवाड यांनी केले आहे.
---
अशी मिळतात उत्तरे
आताच निघालो आहे, मेडिकलला चाललो आहे पण त्याबाबतची डॉक्टरांची चिट्टी मात्र घरी आहे, शेतात चाललो आहे, घरातला रुग्ण दवाखान्यात ॲडमिट आहे, त्याला तातडीने भेटायचे आहे, गडबडीत लायसन्स घरी विसरलो आहे.
----
नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, आपल्या घरातील सदस्यांना धोक्यात घालू नये. मोकाट फिरणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल.
- हनुमंत वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक
---
१७ कुर्डूवाडी
शहरात विनाकारण रस्त्यावरून फिरणाऱ्यांवर कारवाई करताना पोलीस अधिकारी व कर्मचारी.
===Photopath===
170521\2016img_20210513_112841.jpg
===Caption===
कुर्डूवाडी पोलीस कारवाई बातमी फोटो