कालिका नगर बनले सेल्फी पॉईंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:15 AM2021-06-30T04:15:10+5:302021-06-30T04:15:10+5:30
गेल्या काही वर्षांपासून शासन राज्यात झाडे लावा, झाडे जगवा ही संकल्पना मोठ्या हिमतीने राबवत आहे. त्यात अक्कलकोट शहरातील कालिका ...
गेल्या काही वर्षांपासून शासन राज्यात झाडे लावा, झाडे जगवा ही संकल्पना मोठ्या हिमतीने राबवत आहे. त्यात अक्कलकोट शहरातील कालिका नगर येथे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक महेश हिंडोळे यांच्या पुढाकारातून शेकडो विविध प्रकारचे झाडे लावण्यात आले होते. त्यापैकी शंभर टक्के झाडे जगवली आहेत. यामुळे एकेकाळी उन्हाळ्यात भयावह स्थिती दर्शविणाऱ्या या नगरात सध्या मोठ्या डौलाने झाडे डोलत आहेत. यामुळे जवळ असलेल्या महाविद्यालयीन तरुण, तरुणींचे सेल्फी पॉईंट बनविले आहेत.
----
कालिका नगर येथे सप्तपर्णी, वड, पिंपळ, कडुलिंब आणि विविध फुलझाडे आदी प्रकारचे पाच वर्षापूर्वी २०० झाडे नगरसेवक महेश हिंडोळे यांनी लावली. त्याची देखभाल मल्लिनाथ मजगे व दिलीप महिंद्रकर यांनी केली. यामुळे ते डौलाने डोलत आहेत. तरुणांना याचा मोह आवरत नसल्याने फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉईंट बनविले आहे.
----
मला झाडे लावण्याचा छंद पूर्वीपासूनच आहे. आजवर विविध ठिकाणी हजारो झाडे लावली आहे. त्यापैकी कालिका नगर, टेनिस कोर्ट असे बरेच ठिकाणी झाडे आहेत. त्याचे ट्री गार्ड बसविणे, अळ्या करणे, वेळप्रसंगी पाणी पुरवठा सुद्धा काही ठिकाणी केला. झाडे जगली याचे श्रेय केवळ तेथील लोकांनांचा जाते.
-नगरसेवक महेश हिंडोळे.
फोटो : २९ अक्कलकोट
ओळ : अक्कलकोट शहरातील कालिका नगर येथे पाच वर्षांपूर्वी नगरसेवक महेश हिंडोळे यांनी लावलेली झाडे आज मोठ्या डौलाने डोलत आहेत.