कळमण आरोग्य केंद्राला मिळाले २० ऑक्सिजन बेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:20 AM2021-05-17T04:20:19+5:302021-05-17T04:20:19+5:30

कळमण : उत्तर सोलापूर तालुक्यात कळमण प्राथमिक आरोग्य केंद्राला २० ऑक्सिजन बेड उपलब्ध झाले. याबरोबरच ५० जनरल बेडही उपलब्ध ...

Kalman Health Center got 20 oxygen beds | कळमण आरोग्य केंद्राला मिळाले २० ऑक्सिजन बेड

कळमण आरोग्य केंद्राला मिळाले २० ऑक्सिजन बेड

Next

कळमण : उत्तर सोलापूर तालुक्यात कळमण प्राथमिक आरोग्य केंद्राला २० ऑक्सिजन बेड उपलब्ध झाले. याबरोबरच ५० जनरल बेडही उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कळमण प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन बेड देण्याची मागणी झाली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर आमदार यशवंत माने, राष्ट्रवादीचे नेते बळीराम साठे, प्रल्हाद काशीद, सरपंच पांडुरंग लंबे यांच्या शिष्टमंडळाने या आरोग्य केंद्राला भेट देत सेवासुविधांची पाहणी केली आणि २० ऑक्सिजन बेड देण्याची ग्वाही आमदारांनी दिली होती. त्यानंतर हालचाली झाल्या आणि कळमण प्राथमिक आरोग्य केंद्राला २० ऑक्सिजन बेड, ५० जनरल बेड उपलब्ध करून झाले. उपसभापती जितेंद्र शिलवंत, सरपंच पांडुरंग लंबे, उपसरपंच सुनील पाटील, सुरेश क्षीरसागर, बजरंग लंबे, अजित पाटील, महाराज लंबे, सोमनाथ करंडे यांनी या बेडचे स्वागत करत प्राथमिक आराेग्य केंद्रात साहित्य बसवून घेतले. याचे लवकरच उद्‌घाटन होणार आहे.

----

फाेटो : १६ कळमण

कळमण प्राथमिक आरोग्य केंद्राला २० ऑक्सिजन बेड मिळाल्यानंतर ते बसवून घेताना सरपंच पांडुरंग लंबे, सुनील पाटील, सुरेश क्षीरसागर.

Web Title: Kalman Health Center got 20 oxygen beds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.