निवडणुकीत दिलेल्या घोषणांची पुर्तता अद्याप का नाही, कन्हैयाकुमारचा भाजप सरकारला सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 06:46 PM2017-11-07T18:46:33+5:302017-11-07T18:48:25+5:30
सोलापूर दि ७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेची दिशाभूल करत आहेत़ निवडणुकीत दिलेल्या घोषणांची पूर्तता मोदी आणि त्यांच्या सरकारकडून होत नाही अशी टीका जेएनयू नेते कन्हैया कुमार यांनी केली आहे आज सोलापुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते .
सोलापूरातील सभेसाठी कन्हैय्याकुमार उस्मानाबादहुन सोलापूरात आले होते़ त्यावेळी ते बोलत होते़ पुढे बोलताना कन्हैय्याकुमार म्हणाले की, देशात दोन कोटी रोजगार देतो म्हणाले प्रत्यक्षात रोजगार मिळाला नाही़ जीएसटीमुळे बेकारी वाढली व्यापार ठप्प झाला़ युवकांसमोर शिक्षणाचा गंभीर प्रश्न आहे बेरोजगारीचे संकटही आहेत देशातील आतंकवाद थांबलेला नाही नोटाबंदीनंतर देशात कॅशलेसची भाषा झाली देशात आत्ताच साठ टक्के लोकांकडे कॅशच नाही तर कॅशलेस आहेतच .काळे धन हुडकले तीन लाख कोटी रुपयांचे काळे धन आणले असा सांगणाºया मोदींनी बुलेट ट्रेनसाठी एक लाख कोटी एक लाख कोटी रुपयांचा कर्ज जपानकडून घेतलं का स्वत:कडे पैसे असताना असं कुणी कर्ज काढता का असा सवालही त्यांनी केला. काळे धन आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात पंधरा लाख जमा करू असं म्हणणाºया मोदींनी काळे धन आल्यानंतर लोकांच्या खात्यावर पैसे का जमा केले नाहीत़ ही सर्व निवडणुकीसाठीची भाषा होती असं मोदींनी कबूल करावं लोक दुर्लक्ष करतील असेही कन्हैया कुमार म्हणाले़
-------------------
गुजरातमध्ये निवडणूक प्रचारासाठी जाणार नाही
सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी व्हावा मात्र सोशल मीडियानं समाज परिवर्तन होणार नाही. डाव्या आघाडीला हवे असलेले बदल देशात होत आहेत .असेही अन्य प्रश्नाच्या उत्तरात कन्हैया कुमार म्हणाले पत्रकार परिषदेवेळी कॉम्रेड आडम मास्तर कॉम्रेड भालचंद्र कांगो उपस्थित होते