करमाळा बोगस कर्ज प्रकरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:16 AM2021-06-29T04:16:15+5:302021-06-29T04:16:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क टेंभुर्णी : करमाळा व माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावावर काढलेल्या बोगस कर्ज प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ...

Karmala bogus loan case | करमाळा बोगस कर्ज प्रकरणी

करमाळा बोगस कर्ज प्रकरणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

टेंभुर्णी : करमाळा व माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावावर काढलेल्या बोगस कर्ज प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना समक्ष भेटून जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे केली आहे.

माजी आमदार नारायण पाटील ,शिवसेना नेते संजय कोकाटे, शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे, माढा तालुका भाजपा अध्यक्ष योगेश बोबडे ,रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सुहास पाटील, तालुका अध्यक्ष दत्तात्रय गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, रिपाइं आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर खरात, राष्ट्रीय समाज पक्षाचे शहर प्रमुख सुनील बुजरके , मनसे माढा तालुका अध्यक्ष सागर लोकरे, शिवसेनेचे विनोद पाटील यांनी या बोगस कर्ज प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Karmala bogus loan case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.