शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्याची करमाळा काँग्रेसची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:23 AM2021-03-27T04:23:45+5:302021-03-27T04:23:45+5:30
करमाळा: शेतकरी विरोधी कायदा रद्द करावा, केंद्र सरकारने गॅस डिझेल पेट्रोलची केलेली दरवाढ त्वरित रद्द करावी अशी मागणी करमाळा ...
करमाळा: शेतकरी विरोधी कायदा रद्द करावा, केंद्र सरकारने गॅस डिझेल पेट्रोलची केलेली दरवाढ त्वरित रद्द करावी अशी मागणी करमाळा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
जिल्हा सरचिटणीस सुनील बापु सावंत यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्ठमंडळाने नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यांना निवेदन देण्यात आले. काँग्रेस पक्षाच्या वतीने हरिभाऊ मंगवडे, हाजी फारूक बेग, फारूक जमादार, श्रीकांत ढवळे हे कार्यकर्ते सहभागी झाले होते. केंद्र सरकारने शेतकरी विरोधात कृषी कायदा करून पिळवणूक करीत आहे. तो कायदा रद्द करण्यात यावा आणि केंद्र सरकारने गॅस डिझेल पेट्रोलची केलेली दरवाढ त्वरित रद्द करावी अन्यथा काँग्रेस पक्षाचे वतीने तीव्र आदोंलन करण्यात येईल असा इशारा सावंत यांनी निवे दनाद्वारे दिला आहे.
---
२६ करमाळा काँग्रेस
करमाळ्याचे नायब तहसिलदार जाधव यांना निवेदन देताना सुनील सावंत,फारुक जमादार, हरीभाऊ मंगवडे, फारुक बेग