करमाळा - कोर्टी रस्ता बनला मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:21 AM2021-03-06T04:21:50+5:302021-03-06T04:21:50+5:30
गेल्या दोन महिन्यात या रस्त्यावर अनेक मोठ मोठे अपघात झाले आहेत. त्यामध्ये दोन ते तीन कुटुंब उघड्यावर पडली आहेत. ...
गेल्या दोन महिन्यात या रस्त्यावर अनेक मोठ मोठे अपघात झाले आहेत. त्यामध्ये दोन ते तीन कुटुंब उघड्यावर पडली आहेत. कुटुंबातील कर्त्या पुरूषांना त्या ठिकाणी जीव गमवावा लागला आहे. राजूरी व दिवे गव्हाण मधील दोन कर्त्या पुरुषांचा समावेश आहे. तर सावडी येथील एका युवकाला पाय गमवावा लागला. छोटे छोटे अपघात तर दिवसाआड घडत आहेत. रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडल्याने हे अपघात होत आहेत.
जिथं चांगला रस्ता वाहतुकीसाठी आहे तो पूर्णपणे खोदलेला आहे आणि खड्डे पडलेले आसलेला रस्ता वाहतुकीसाठी जीव घेणा ठरत आहे. ठेकेदार व अधिकाऱ्यांकडे खड्डे बुडवण्याची मागणी केली आहे परंतु त्याकडे दुुर्लक्ष होत आहे. दोन तीन दिवसात खड्डे नाही बूजिवले तर राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा तालुका वतीने कोर्टीत रस्ता रोको आंदोलन केले जाईल व घडलेल्या अपघाताला ठेकेदार जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधा गुन्हा दाखल करावा अशी मागणी तालुका कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी केली आहे.
फोटो ओळी :०५करमाळा-रोड
करमाळा -कोर्टी रस्त्यावर असे खड्डे पडले आहेत.