करमाळ्याच्या भांडणात माढ्याचा लाभ; संजयमामांच्या आमदारकीचा ‘जेसीबी’त रुबाब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 01:29 PM2019-10-25T13:29:36+5:302019-10-25T13:29:43+5:30
Karmala Vidhan Sabha Election Results 2019: करमाळा विधानसभा मतदारसंघ; प्रत्येक फेरीला चढउतार : ५ हजार ४९४ मताधिक्य; शेवटच्या टप्प्यांमध्ये मामांनी मारली बाजी
नासीर कबीर
करमाळा : अटीतटीच्या व चुरशीच्या तिरंगी लढतीत करमाळाविधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार झेड. पी. अध्यक्ष संजयमामा शिंदे ५ हजार ४९४ मताधिक्य मिळवून विजयाचा षटकार ठोकला. त्यांनी अपक्ष उमेदवार नारायण पाटील व शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवार रश्मी बागल यांचा पराभव केला. करमाळ्याच्या भांडणात माढ्याचा लाभ; संजयमामांच्या आमदारकीचा ‘जेसीबी’त रुबाब असल्याचे दिसून आले.
करमाळ्यात तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या धान्य गोदामात निवडणूक निर्णय अधिकारी किशोर पवार यांनी १४ टेबलवरून सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ केला. प्रथम टपाली मतदान मोजण्यात आले. यामध्ये संजयमामा श्ािंदे यांना ६९९, नारायण पाटील यांना ६९७, बागल यांना ३८० तर राष्टÑवादीचे संजय पाटील-घाटणेकर यांना १२ व अन्य उमेदवारांना शून्य मते पडली. टपाली मतात नोटाला ७ मते पडली व तब्बल ८७ मते बाद झाली.
त्यानंतर ३३४ ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी २४ फेºयांमध्ये करण्यात आली. पहिल्या १ ते १७ फेरीत करमाळा तालुक्यातील १ लाख ५२ हजार मतांच्या मोजणीत नारायण पाटील यांनी पहिल्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, आठव्या ते थेट सतराव्या फेरीपर्यंत आघाडी घेतली. रश्मी बागल यांना दुसºया, तिसºया, सातव्या फेरीत आघाडी मिळाली. पण नारायण पाटील यांची लीड त्या तोडू शकल्या नाहीत.
संजयमामा शिंदे करमाळा तालुक्यात पहिल्या क्रमांकावर राहिले. १ ते १७ फेºयांमधून नारायण पाटील यांना ६३,२१८, रश्मी बागल यांना ४३,४९१ व संजयमामा शिंदे यांना ३८,३६० मतदान मिळाले.
कुर्डूवाडी व ३६ गावांतून संजयमामांना मताधिक्य.
करमाळा तालुक्यातील मतांची मोजणी पार पडल्यानंतर मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कुर्डूवाडीसह ३६ गावांतून झालेल्या ६१ हजार मतांची मोजणी ७ फेºयांतून झाली. त्यामध्ये अठराव्या फेरीपासून ते थेट चोविसाव्या फेरीपर्यंत संजयमामा श्ािंदे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार नारायण पाटील व रश्मी बागल यांच्यापेक्षा प्रत्येक फेरीत पाच हजार मताधिक्य घेऊन मुसंडी मारली. या भागातील ७ फेºयांतून संजयमामा श्ािंदे यांना तब्बल ३९ हजार २५६ मते मिळाली, तर नारायण पाटील यांना अवघी ९ हजार २७९ व रश्मी बागल यांना ९ हजार २३६ मते मिळाली. वंचित आघाडीचे अतुल खुपसे, बसपाचे जैनुद्दिन शेख, राष्टÑवादीचे संजय पाटील घाटणेकर, अपक्ष राम वाघमारे व अॅड. विजय आव्हाड यांचा करिश्मा चालला नाही. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले.
मला मिळालेला विजय हा जनतेचा विजय असून, करमाळा, माढा मतदारसंघाच्या विकासाला आपण प्रथम प्राधान्य देणार आहे.
-संजयमामा शिंदे,
विजयी उमेदवार
मतदारांनी आपण केलेल्या विकासकामाकडे पाहून मला भरभरून मतदान केले असून, मतदारांनी दिलेला कौल मला मान्य आहे. यापुढेही विकासाची कामे करीत राहू.
-नारायण पाटील, पराभूत उमेदवार
जनतेचा कौल मान्य असून, पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारला आहे. यापुढेही शिवसेनेच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत राहणार.
-रश्मी बागल
उमेदवारांना मिळाली अशी मते
- - संजयमामा विठ्ठलराव शिंदे अपक्ष : ७८,८२२
- - नारायण गोविंद पाटील, अपक्ष : ७३,३२८
- - रश्मी दिगंबर बागल, शिवसेना : ५३,२९५
- - अतुल खुपसे, वंचित आघाडी : ४४६८
- - संजय पाटील-घाटणेकर, राष्ट्रवादी काँगे्रस : १३९१
- - राम वाघमारे, अपक्ष : ७९४
- - अॅड. विजय आव्हाड, अपक्ष : ५४८
- - नोटा : १५९७