करमाळा बाजार समितीचे तीन गाळे केले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:23 AM2021-03-27T04:23:14+5:302021-03-27T04:23:14+5:30
करमाळा : वारंवार नोटिसा देऊनही मालमत्ता कर न भरल्याने नगरपरिषदेच्या पथकाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे तीन गाळे ...
करमाळा : वारंवार नोटिसा देऊनही मालमत्ता कर न भरल्याने नगरपरिषदेच्या पथकाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे तीन गाळे शुक्रवारी सील केले. मार्च अखेर असल्याने नगरपरिषद कार्यालयातील वसुली विभाग शनिवार, रविवार व सोमवार या सुट्ट्यांच्या दिवशीही कार्यालय चालू राहणार असल्याचे आवाहन प्रशासन अधिकाऱ्यांनी केले आहे.
नगर परिषदेच्या अधिकारी वीणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय अधीक्षक डी.डी.देशमुख, कर निरीक्षक दत्तात्रय बदे, लिपीक प्रदिप शिंदे, मल्हारी चांदगुडे, राजेंद्र झाडबुके, बाळासाहेब महाडीक यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मिळकतदारांना नगरपरिषदेचा मिळकत कर भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर थकबाकीवर व्याज लागते. जप्तीची कारवाई करून थकबाकी वसूल केली जाते. याबाबत प्रशासनाने वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. मात्र याला प्रतिसाद न मिळाल्याने पथकाने ही कारवाई केली.
या पथकाकडून संबंधितांवर नळजोडणी खंडित करणे, मालमत्ता सील करणे या कारवाया करण्यात येत आहेत. मालमत्ता कर भरण्याबाबत मुख्याधिकारी वीणा पवार यांनी आवाहन केले.