करमाळा बाजार समितीची प्रारूप यादी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 02:12 PM2018-06-13T14:12:20+5:302018-06-13T14:12:20+5:30
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जाहीर केली.
सोलापूर : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जाहीर केली. त्यावर हरकती दाखल करण्यासाठी २५ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. १३ जुलै रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे.
सोलापूर आणि बार्शी बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम सध्या सुरू आहे. यादरम्यान जिल्हा निवडणूक कार्यालयाने ३१ डिसेंबर २०१७ हा अर्हता दिनांक निश्चित करून करमाळा तहसीलदारांना करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदारांनी १५ गणातील १ लाख १४ हजार ८०० मतदारांची प्रारूप यादी सादर केली.
अडते आणि व्यापारी मतदारसंघात २४२ आणि हमाल-तोलार मतदारसंघात १४१ मतदारांचा समावेश आहे. बाजार समितीच्या मतदार यादीसंदर्भात हरकती असल्यास जिल्हा निवडणूक अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या नावे करमाळा तहसील कार्यालयात २५ जूनपर्यंत दाखल कराव्यात, असेही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी कळविले आहे. या दावे-हरकतींवर २६ जून ते ७ जुलै या कालावधीत निर्णय घेण्यात येईल. १३ जुलै रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीत आता शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. १० गुंठ्यांवर शेतजमीन धारण करणाºया शेतकºयांचा बाजार समितीच्या मतदार यादीत समावेश करण्यात येतो.
येथे पाहायला मिळेल...
- जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखा, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालय, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय, तहसील कार्यालय करमाळा, सहायक निबंधक सहकारी संस्था करमाळा यांचे कार्यालय येथे १३ जूनपासून प्रारूप मतदार यादी पाहायला मिळेल.
गणाचे नाव आणि एकूण मतदारसंख्या
- जातेगाव ७९१४, पोथरे ७६५२, रावगाव ६६५०, वीट ७५२०, सावडी ८२७४, जिंती ६१५७, राजुरी ६७८०, वाश्ािंबे ६३९१, उमरड ७६१६, झरे ९०२७, हिसरे ८५२८, साडे ७७६४, केम ९९६७, वांगी ६७३३, कंदर ७८१७. अडते-व्यापारी २४२, हमाल-तोलार १४१. असे एकूण १ लाख १५ हजार १८३ मतदारांचा समावेश आहे.