करमाळा नगरपरिषदेने कचºयातून फुलविली बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:53 PM2018-12-27T12:53:39+5:302018-12-27T12:55:50+5:30

करमाळा : करमाळा नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत शहरातून जमा केल्या जाणाºया ओल्या कचºयापासून तयार केलेल्या सेंद्रिय खतावर नाना-नानी ...

Karmala Nagarparishad flushed out of the glass area | करमाळा नगरपरिषदेने कचºयातून फुलविली बाग

करमाळा नगरपरिषदेने कचºयातून फुलविली बाग

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्याधिकाºयांनी केली पाहणी स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमातून विविध प्रयोगकचºयापासून सेंद्रिय खतनिर्मिती...

करमाळा : करमाळा नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत शहरातून जमा केल्या जाणाºया ओल्या कचºयापासून तयार केलेल्या सेंद्रिय खतावर नाना-नानी पार्क, महावीर उद्यान व अग्निशमन केंद्र या ठिकाणी झेंडूची लाल, भगवी फुले फुलविली आहेत.

 करमाळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, मुख्याधिकारी वीणा पवार हे नगरपरिषदे कडून राबविल्या जाणाºया स्वच्छ सर्वेक्षण या उपक्रमातून नवनवीन उपक्रम राबवित असून, शहरातून दररोज घंटागाडीच्या माध्यमातून जमा होणाºया ओल्या कचºयापासून तयार केलेल्या सेंद्रिय खतातून रंगीबेरंगी झेंडूची फुले बहरली आहेत. हा उपक्रम शहरवासीयांना सुखद धक्का देणारा ठरला आहे. गेल्या चार वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या सातनळ विहिरीजवळील नाना-नानी पार्क, महावीर उद्यान व अग्निशमन केंद्र इमारत व परिसर या ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत सुशोभीकरण करण्यात आले आहे. 

करमाळा शहरात गटार स्वच्छ व दुर्गंधीमुक्त करण्याचा उपक्रम राबविण्यात आलेला असून, या उपक्रमाचे शहरवासीयांकडून कौतुक होत आहे.

कचºयापासून सेंद्रिय खतनिर्मिती...
- करमाळा नगरपरिषद ओल्या कचºयापासून सेंद्रिय खत निर्माण करत असून, या खताचा वापर स्वत:च्या बागेसाठी करून झेंडूची श्ोती फुलविली आहे. यामुळे बगीचा व शहर सुंदर दिसत आहे. या फुलाच्या विक्रीतून नगरपरिषदेस आर्थिक उत्पन्न मिळणार असल्याचे मुख्याधिकारी वीणा पवार यांनी सांगितले़ 

स्वच्छता हा आपला आवडीचा विषय असून, कचरा ही टाकाऊ गोष्ट आहे, असा आपला समज आहे. त्यावर योग्य प्रक्रिया केली तर त्याचे सोने होते, असेच म्हणावे लागेल. नगरपरिषदेकडून ओला व सुका कचºयापासून खत निर्माण केले जात आहे.
- वैभवराजे जगताप
नगराध्यक्ष,
करमाळा नगरपरिषद

Web Title: Karmala Nagarparishad flushed out of the glass area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.