करमाळा तालुक्यात मतदानात ढोकरीचा टक्का सर्वाधिक, साडे पडले मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:20 AM2021-01-17T04:20:48+5:302021-01-17T04:20:48+5:30
करमाळा तालुक्यात ५१ पैकी ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे मतदान शुक्रवारी शांततेत पार पडले. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सदस्य संख्येनुसार १५ ...
करमाळा तालुक्यात ५१ पैकी ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे मतदान शुक्रवारी शांततेत पार पडले. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सदस्य संख्येनुसार १५ हजार ते ७५ हजार रुपये खर्च करण्यास मान्यता दिली असली तरी निवडणूक आयोगाने दिलेल्या खर्चाच्या मर्यादा बहुतेक ग्रामपंचायत निवडणुकील उमेदवारांनी ओलांडल्याचे या चर्चेवरून दिसून येते. जातेगाव, देवळाली, मांगी, साडे या ग्रामपंचायतीमधील एका उमेदवारांचा खर्च तब्बल तीन ते पाच लाखांपर्यंत झाला मात्र त्याला अधिकृत कोणताही पुरावा नसल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई, पुणे येथे कामधंद्याच्या निमित्ताने गेलेल्या गावाकडील मतदारांना खासगी वाहने भाड्याने करून त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून मतदानासाठी आणण्यात आले. त्यावर हजारो रुपये खर्च करण्यात आला. करमाळा तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमधून ६७ हजार २०३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला शेकडा ८४.०४ टक्के मतदान झाले. त्यामध्ये ३० हजार ९४६ महिला, तर ३६ हजार २५७ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
----