करमाळा तालुक्याची सुरक्षा तोकड्या पोलिसांवरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 02:16 PM2019-06-03T14:16:28+5:302019-06-03T14:21:30+5:30

२ लाख ५० हजार नागरिकांच्या सुरक्षेचा कारभार रामभरोसे 

Karmala taluka security police! | करमाळा तालुक्याची सुरक्षा तोकड्या पोलिसांवरच !

करमाळा तालुक्याची सुरक्षा तोकड्या पोलिसांवरच !

googlenewsNext
ठळक मुद्दे करमाळा पोलीस ठाणे अंतर्गत दीडशे कर्मचाºयांची व आठ ते दहा अधिकारी वर्गाची आवश्यकताजेऊर व जिंती परिसरात तब्बल पंधरा ते वीस वर्षांपासून पोलीस स्टेशनसाठी प्रस्ताव पाठविण्यात येत आहेतप्रत्येक क्षेत्रामध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने दोन-तीन कर्मचाºयांवर औटपोस्टचे कामकाज चालू ठेवावे लागते.  

नासीर कबीर  

करमाळा :  पोलीस ठाण्याचा कारभार ११० पोलीस कर्मचाºयांवर चालू असून, २ लाख ५० हजार नागरिकांच्या सुरक्षेचा कारभार रामभरोसे चालू आहे. 

करमाळा पोलीस स्टेशन अंतर्गत जेऊर, केम, जिंती दूरक्षेत्र असून यामध्ये तब्बल ११८ गावखेडी वस्तीचा यात अंतर्भाव होतो.  करमाळ्यापासून जिंतीपर्यंत ५५ ते ६० किलोमीटर एवढे अंतर आहे. 

यासाठी जिंती औटपोस्ट निर्मिती करण्यात आली आहे. टेंभुर्णी-अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावर चापडगावपर्यंत ३० किलोमीटरपर्यंत करमाळा तालुक्याची हद्द आहे. पूर्वेकडे आवाटी तब्बल ३५ किलोमीटर दूरवर आहे. कुर्डूवाडी रोडवरील वरकुटेपर्यंत करमाळा तालुक्याचे क्षेत्र आहे. टेंभुर्णीकडे दक्षिणेच्या बाजूला राष्ट्रीय महामार्गावर ४० किलोमीटर कंदर गावच्या पुढील अंतर करमाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येते. 
करमाळ्याच्या ईशान्य भागाकडे केम हे दूरक्षेत्र असून ते पंचवीस किमी अंतरावर आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने दोन-तीन कर्मचाºयांवर औटपोस्टचे कामकाज चालू ठेवावे लागते.  

करमाळ्याच्या पश्चिम विभागाकडे रेल्वेचे साम्राज्य असून, केम, भाळवणी ते जिंती, पारेवाडी, भिगवणपर्यंत करमाळ्याला लागून रेल्वेचे क्षेत्र आहे. या भागातील गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात असून ती रेकॉर्डवर येत नाही. रेल्वेचा भाग असल्याने रेल्वे अडवणे, रेल्वे लुटणे, रेल्वे अतिक्रमण करणे, रेल्वेतील प्रवाशांना लुटणे, दगडफेक करणे, चेन स्नॅचिंग, रेल्वे रुळावर दगड टाकून अपघात करणे याबरोबरच गोळीबारसारखी प्रकरणे या भागात सातत्याने घडत आहेत. त्यामुळे या भागातील सुरक्षितता नेहमीच ऐरणीवर आलेली आहे.

 वाहनाशिवाय पोलीस ठाणे
- २६ मार्च २०१९ रोजी करमाळा पोलीस स्टेशन स्टेशनच्या वाहनाला रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना सावडी येथे अपघात झाला होता.  त्यावेळेपासून तब्बल दोन महिन्यापासून पोलीस निरीक्षकसारख्या अधिकाºयाला मोटरसायकलचा वापर करून काम करावी लागत आहेत.  खासगी वाहन करून जिंती, पारेवाडी त्या भागाकडे जाताना तसेच नाईट राऊंड करताना  खासगी वाहनातून प्रवास करावा लागतो. सध्या शहरी व ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात घरफोडी, चोºया, दरोडे वाटमारी असे गुन्हे घडत आहेत. 

- जेऊर व जिंती परिसरात तब्बल पंधरा ते वीस वर्षांपासून पोलीस स्टेशनसाठी प्रस्ताव पाठविण्यात येत आहेत.  प्रस्ताव प्रत्येक वेळेस नाकारण्यात येत आहेत. जिंती येथे गंभीर गुन्ह्याचे  प्रमाण नसल्याने याठिकाणी पोलीस स्टेशनला मंजुरी मिळत नाही. या भागातील बरेच गुन्हे रेकॉर्डवर येत नसल्याने त्याची नोंद होत नाही. दूर अंतरावर असल्याने अनेक ग्रामस्थ करमाळा पोलीस स्टेशनपर्यंत धाव घेताना दिसत नाहीत. यासाठी जिंती, पारेवाडी या भागातील रेल्वे विभागाने ही पोलिसांची औटपोस्ट उभा करून पोफळज, वाशिंबे, जिंती, पारेवाडी ते भाळवणी परिसरातील रेल्वे गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पोलीस स्टेशनमध्ये एकशे दहा कर्मचारी असून बारा कर्मचारी हवालदार व जमादार वर्गात कर्तव्यात आहेत. सध्या पोलीस वाहनाला अपघात झाला असल्याने पोलीस स्टेशनला वाहन उपलब्ध नाही. त्यामुळे वेळप्रसंगी खासगी वाहनातून बंदोबस्तासाठी जाऊन प्रयत्न करावे लागतात.  पन्नास किलोमीटर अंतरावर प्रवास करावा लागत असल्याने व अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने आम्ही अडचणीत असलो तरी नागरिकांच्या सुरक्षेला महत्त्व देत आहोत.  
-श्रीकांत पाडुळे
पोलिस निरीक्षक, करमाळा

१५० कर्मचाºयांची गरज
- करमाळा पोलीस ठाणे अंतर्गत दीडशे कर्मचाºयांची व आठ ते दहा अधिकारी वर्गाची आवश्यकता असताना आज केवळ एकशे दहा कर्मचारी करमाळा पोलीस दलात कर्तव्य बजावत आहेत. यातील ९८ कर्मचारी हे कॉन्स्टेबल, नाईक पदावर काम करणारे आहेत. बारा कर्मचारी हवालदार, सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत.  यामधूनही पोलिसांच्या अनेक अडीअडचणी असल्याने रजा, आजारी रजा, बदली, सुट्टी, आजारपण आदी कारणाने यातील पुरेसे कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. तुरुंग विभागाच्या सुरक्षेसाठी आठ ते दहा कर्मचारी गुंतून पडतात तर न्यायालयीन कामकाज, आॅफिस कर्मचारी यामुळे कर्मचारी वर्ग अपुरा पडत आहे. महिला पोलीस कर्मचाºयांमध्ये हवालदार महिला कर्मचारी नसल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. त्यातच करमाळा पोलीस सुविधेशिवाय कर्तव्य बजावत असतात.

Web Title: Karmala taluka security police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.