कर्मवीर मामासाहेबांच्या शिक्षणसंस्था या दर्जेदारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:40 AM2021-02-06T04:40:54+5:302021-02-06T04:40:54+5:30

शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्यिक प्राचार्य ...

Karmaveer Mamasaheb's educational institutions are of this quality | कर्मवीर मामासाहेबांच्या शिक्षणसंस्था या दर्जेदारच

कर्मवीर मामासाहेबांच्या शिक्षणसंस्था या दर्जेदारच

Next

शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्यिक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे होते. कार्यक्रमास आ. राजेंद्र राऊत, ग्लोबल टीचर्स पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव विष्णू पाटील, सहसचिव प्रकाश पाटील, बापू शितोळे, दिलीप रेवडकर, डॉ. प्रकाश बुरगुते, प्राचार्य प्रकाश थोरात, एस. एस. गोरे उपस्थित होते.

यावेळी आ. राजेंद्र राऊत, रणजितसिंह डिसले, डॉ. सुशीलकुमार लवटे, डॉ. बी. वाय. यादव यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. रविकांत डोळस व ज्योती डोळस यांनी केले, तर आभार नंदन जगदाळे यांनी मानले.

यांचा केला सन्मान

यावेळी जागतिक कीर्तीचा ग्लोबल टीचर्स पुरस्कार रणजितसिंह डिसले यांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व २५ हजार रोख, पानगाव येथील वीरपत्नी अर्चना काळे, वाघाचीवाडी येथील भास्कर वाघ यांचे वडील सोमनाथ वाघ, आई व पत्नी यांनाही संस्थेने आहेर रोख १० हजार देऊन सन्मान केला.

फोटो

०५बार्शी सत्कार ०१,०२

ओळी :

बार्शी येथील कार्यक्रमात रणजितसिंह डिसले व वीरपत्नी अर्चना काळे यांचा सन्मान करताना मान्यवर.

Web Title: Karmaveer Mamasaheb's educational institutions are of this quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.