सीमावर्ती चेकपोस्टवर कर्नाटक-महाराष्ट्र पोलिसांचे खटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:20 AM2021-04-05T04:20:10+5:302021-04-05T04:20:10+5:30

कर्नाटकातून महाराष्ट्रात एन्ट्री होणा-याच्या ठिकाणी एकूण सहा चेकपोस्ट असून तेथे कर्नाटक पोलीस कडक अंमलजबावणी करीत आहेत. याउलट महाराष्ट्राच्या सीमेवर ...

Karnataka-Maharashtra police raids border checkposts | सीमावर्ती चेकपोस्टवर कर्नाटक-महाराष्ट्र पोलिसांचे खटके

सीमावर्ती चेकपोस्टवर कर्नाटक-महाराष्ट्र पोलिसांचे खटके

Next

कर्नाटकातून महाराष्ट्रात एन्ट्री होणा-याच्या ठिकाणी एकूण सहा चेकपोस्ट असून तेथे कर्नाटक पोलीस कडक अंमलजबावणी करीत आहेत. याउलट महाराष्ट्राच्या सीमेवर केवळ दोन ठिकाणी चेक पोस्ट आहे. त्या ठिकाणी पोलीसच नसतात, असे प्रवाशांनी सांगितले. यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकातून जाणाऱ्या प्रवाशांकडे कोरोना रिपोर्ट नसतो. परिणामी याचा त्रास कर्नाटक पोलिसांना होत आहे.

कर्नाटक शासनाने सीमा हद्दीतील अफझलपूर-दुधनी मध्ये सिन्नूर जवळ, हिरोळी, मणूर, माशाळ, निंबाळ, बळोरगी, आजुणगी या सहा ठिकाणी चेक पोस्ट तयार केले. त्याठिकाणी महसूल, आरोग्य, पोलीस यांचे पथक तैनात केले आहेत. येथील चेक पोस्ट ४० दिवसांपासून कार्यरत आहे. या ठिकाणी आतापर्यंत ८०० हुन अधिक महाराष्ट्र हद्दीतील वाहने परत पाठविले आहेत. कर्नाटक हद्दीतील ५०० गाड्या परत पाठवलेल्या आहेत.

एकंदरीत कर्नाटक चेक पोस्टवर कडक अंमलबजावणी होते, याउलट महाराष्ट्र सीमा हद्दीतील परिस्थिती गंभीर दिसत नाही. सिन्नूर व वागदरीजवळ असे केवळ दोन ठिकाणी चेक पोस्ट कार्यरत आहेत. मात्र त्या ठिकाणी पोलीस कर्मचारीच नसतात.

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्यांची संख्या जास्त

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या बाबतीत सर्वात हॉट असलेल्या पुणे येथील सर्वाधिक लोक आजही अक्कलकोट तालुक्यातील कर्नाटक चेक पोस्ट आढळून येत आहेत. त्यांना विचारले असता दर्शनासाठी गाणगापूर येथे जात असल्याचे सांगितले जाते. तेव्हा महाराष्ट्र चेकपोस्टवर त्यांना तपासणीविना सोडण्यात येते. मात्र कर्नाटक हद्दीत कडक अंमलबजावणी केली जात असल्याचे दिसून आले.

कोट ::::::::

कर्नाटक हद्दीत कोरोना विषयक कडक अंमलबजावणी होत आहे. चेकपोस्टवर कोणाचीही मुलाहिजा न बाळगता कारवाई होते. याउलट महाराष्ट्र हद्दीत चेकपोस्ट टेंटमध्ये कोणीच राहत नाहीत. त्याचा फटका आम्हाला बसत आहे. त्या हद्दीतून येणारे लोक आमच्याकडे हुज्जत घालीत आहेत.

- शिवकुमार मठ, श्रीशैल माळी,

आरोग्य अधिकारी

फोटो

०४अक्कलकोट०१

कर्नाटक हद्दीतील चेकपोस्टवर कर्मचारी तैनात असल्याचे दिसत आहेत.

०४अक्कलकोट०२

महाराष्ट्र हद्दीतील दुधनी-अफणलपूर मार्गावरील टेंट कर्मचारीविना रिकामा दिसत आहेत.

Web Title: Karnataka-Maharashtra police raids border checkposts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.