कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणूक जातीधर्माची!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 08:21 PM2018-05-07T20:21:40+5:302018-05-07T20:21:40+5:30
२०१८ कर्नाटक विधानसभा निवडणूक ऐन रंगात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कर्नाटकात सभांचा सपाटाच लावला.
मामाश्री गायकवाड
२०१८ कर्नाटक विधानसभा निवडणूक ऐन रंगात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कर्नाटकात सभांचा सपाटाच लावला. त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही अनेक सभा घेतल्या. पुढील गुरुवारी म्हणजे १० मे रोजी प्रचाराची सांगता होणार आहे. सत्ताधारी काँग्रेस व केंद्रातील सत्ताधारी भाजप यांच्या दरम्यान चालू असलेल्या कडव्या संघर्षात कर्नाटकातील गोरगरीब शेतकरी, कामगार व इतर कष्टकरी समाज नेमकी कोणती भूमिका बजाविणार यावर दोन्ही राजकीय पक्षांचे भवितव्य अवलंबून आहे. पंतप्रधानांनी कर्नाटकातील कलबुर्गी येथील जाहीर सभेत काँगेसला ज्या पद्धतीने आव्हान दिले ते पाहता ते नेहमीपेक्षा जास्त आक्रमक झालेले दिसत आहेत.
काँग्रेस सरकारने १६५ आश्वासन दिले होते त्या पैकी १५५ अश्वासनाची पूर्तता केले आहे. सध्याला कर्नाटकात आमच्या बाजूनेच लाट आहे. आम्ही दिलेल्या आश्वासनांचे पालन केले आहे. अनेक विकासकामे पूर्ण केली आहेत. शेतकरी करीता चार वर्षात ४५ हजार कोटी रुपये खर्च केले असून अनेक योजना राबवून त्यांचा सर्व स्तरातील जनतेला लाभ मिळवून दिला आहे. अलमट्टी धरण परिसरातील पाटबंधारे योजनेला प्राधान्य देवून पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यात आले तसेच आलमट्टी धरणाची उंची ५१९ फुटावरून वरून ५२४ फुटापर्यंत वाढविण्यात आली. असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी केले.
दोन दिवसांपूर्वी एका सभेत त्यांनी, हातात कागदपत्रे न घेता १५ मिनिटे जाहीर सभेत बोलून दाखवावे, असे आव्हान राहुल गांधी यांना दिले. त्याला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ट्विटरद्वारे प्रतिआव्हान देताना येडियुरप्पांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत केलेल्या विकासकामांवर मोदींनी १५ मिनिटे बोलून दाखविण्याचे प्रतिआव्हान दिले. पंतप्रधानांनी गुरुवारी कलबुर्गी आणि बेल्लारी येथील जाहीर सभेत कर्नाटकात असलेले सरकार हे सिद्ध रुपय्या अशी टीका करताना विद्यमान कॉंग्रेस सरकारवर सणकून टीका केली. २०१८ कर्नाटकातील विधानसभा निवडणुका या जातीपातीच्या व धर्मावर आधारित होत आहेत.
उत्साहाच्या भरात पंतप्रधानांनी आपल्या भाषणात भाजपा पक्षाने व सरकारने एका मुस्लिम व्यक्तीची राष्ट्रपती पदावर नियुक्ती केली, असे जाहीर करून डॉ. अब्दुल कलाम यांचे कर्तृत्व खुजे केले. डॉ. अब्दुल कलाम हे मुस्लिम म्हणून त्या पदावर बसलेले नव्हते तर एक अतिशय हुशार, बुद्धिमान व्यक्तिमत्त्व, प्रख्यात शास्त्रज्ञ व तेवढेच लोकप्रिय व्यक्तिमत्त्व, या नात्यानेच वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली होती मात्र भाजपने एका मुस्लिम व्यक्तीला देशाचे सर्वोच्च पद मिळवून दिले हे सांगताना मोदी यांनी नेमके काय साध्य केले? डॉ. अब्दुल कलाम यांच्या नावातच सारे आले.
देशाचे प्रख्यात वैज्ञानिक म्हणून त्यांची ख्याती आहे परंतु त्यांची जात वा धर्म वर काढून त्यांना सर्वोच्च पद दिले असे सांगण्याची आवश्यकता होती का? एका सर्वसामान्य व गरीब अशा दलिताला आता भाजपने राष्ट्रपतीपद बहाल केले. रामनाथ कोविंद असे त्यांचे नाव आहे व ते राष्ट्रपती बनविण्यात भाजपने महत्त्वाची कामगिरी उचलली, हे मान्य करावे लागेल मात्र एका दलित व्यक्तीला राष्ट्रपतीपदी नेऊन बसविले, हे निवेदन राष्ट्रपतीपदाच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारे आहे. तेव्हा २०१८ कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्यावेळी उत्साहाच्या भरात पंतप्रधानदेखील वैयक्तिक पातळीवर येऊ लागणे, हा प्रकार तेवढाच गंभीर स्वरुपाचा आहे. कर्नाटकातील निवडणुका अंतिम टप्प्यात आहेत.
पुढील गुरुवारी सायंकाळी प्रचार संपुष्टात येईल. तोपर्यंत प्रचार कोणती पातळी गाठेल, राजकारणाची परिसीमा कोण कशा पद्धतीने गाठेल, हे सांगता येणार नाही. एक गोष्ट मात्र राजकीय नेत्यांनी प्रकषार्ने टाळली पाहिजे होती, जी कोणाच्याही नजरेतून सुटलेली नाही व ती म्हणजे जातीपातीचे राजकारण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बेल्लारीतील भाषण ऐकल्यानंतर ह्यमोदीजी! आपण देखील? असा प्रश्न उपस्थित होतो. कर्नाटकातील निवडणुका आठ दिवसांच्या परंतु जातीपातीच्या राजकारणाने आपण समाजाचे फार मोठे नुकसान करीत आहोत, याचे भान कोणत्याही राजकीय नेत्याला राहिलेले नाही.
काँग्रेस पक्षातील काही मुस्लिम धर्मनेत्यांनी तर कहरच केला. प्रत्येक जिल्ह?ात एक जागा काँग्रेसने मुस्लिमांसाठी राखीव ठेवावी, अशी केलेली मागणी, हे सारे काय दर्शविते? काँग्रेसच्या कर्नाटकातील तीन मंत्र्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करून मंदिरांवरील भगवा ध्वज काढण्याची आणि यक्षगान कार्यक्रमांवर बंदी घालण्याची केलेली मागणी पाहता हा प्रकारदेखील आक्षेपार्ह आहे. काँग्रेसच्या एका मुस्लिम उमेदवाराने तर कर्नाटकात पुन्हा काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल व आपण मंत्री होऊन त्यानंतर पाहून घेईन, असा इशारा दिला. या साºया प्रकाराने कर्नाटकातील निवडणुकीच्या निमित्ताने जातीयवाद्यांनी धर्ममातंर्डाने पुन्हा डोके वर काढले आहे व यामध्ये सर्वच पक्षांचे नेते सहभागी आहेत. धर्मांध नेते कोण असे विचारण्याची आवश्यकताच नाही. या निवडणुकांमध्ये जात-पात, धर्मवादाला खतपाणी घालण्याचे काम सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केलेले आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर असणाºया पंतप्रधानांकडून तरी ही अपेक्षा नव्हती. दुदैर्वाने त्यांनी धर्मवाद व जातीयवादाचा उल्लेख टाळला नाही. कर्नाटकाच्या निवडणुका या सरळ व सोप्या साध्या वाटेने जिंकता येणार नाहीत, याची जाणीव काँग्रेसला झाली आहे, तशी ती भाजपलाही झालेली आहे.
काँग्रेस व भाजपने नाकारलेल्या बंडखोरांना घेऊन निधर्मी जनता दल कर्नाटकात तिसºया स्थानावर येण्यासाठी धडपडत आहे. या पक्षाचा डोळा मुस्लिम मतांवर जास्त. मुस्लिम मतांची संख्या कर्नाटकात २२ ते ३० टक्के एवढी आहे. काँग्रेस आणि जनता दल-एस मध्ये या मतांवर डोळा ठेवून संघर्ष आहे. या निधर्मी जनता दलाने जास्तीत जास्त उमेदवारी देवेगौडांच्या नातेवाईकांना देऊन फॅमिली राजची जोरदार तयारी चालविली आहे. त्याला कर्नाटकातील जनता कितपत प्रतिसाद देईल हे येणारा काळ ठरविणार आहे. आपण कितीही निधर्मी वा सेक्युलर असल्याचे ढोल कोणत्याही राजकीय नेत्याने बडविले तरीदेखील निवडणुका म्हटल्यानंतर उमेदवारीदेखील जात, पात व धर्म या विषयावरूनच ठरते. त्याही पलीकडे जाऊन अलीकडे जनता व मतदारदेखील या गोष्टींचा पहिला विचार करतात. दुसरा विचार पक्षाचा आणि तिसरा विचार उमेदवारांतील गुणांचा. राजकारणाचा हा दर्जा घसरायला जबाबदार आपण सर्वजण आहोतच परंतु सेक्युलरवादाच्या सर्वच पक्षांचा बुरखा हा या निवडणुकीत टराटरा फाडला गेला, हे सत्य आहे. यात तिळमात्र शंका नाही.