कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कासेगावची यात्रा रद्द; साध्या पध्दतीने होणार धार्मिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 02:09 PM2021-01-07T14:09:07+5:302021-01-07T14:12:11+5:30

कोणत्याही भाविकांनी यात्रेसाठी येऊ नये; मंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार

Kasegaon trip canceled on the back of Corona; Religious programs will be held in a simple manner | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कासेगावची यात्रा रद्द; साध्या पध्दतीने होणार धार्मिक कार्यक्रम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कासेगावची यात्रा रद्द; साध्या पध्दतीने होणार धार्मिक कार्यक्रम

googlenewsNext

सोलापूर/पंढरपूर  : राज्यासह इतर राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेली कासेगांव ता. पंढरपूर येथील यल्लामा देवीची  ९ ते ११ जानेवारी दरम्यान होणारी यात्रा  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. यात्रा कालावधीत यल्लामा देवीच्या यात्रेतील ‍ धार्मिक विधी, रुढी परंपरेनुसार करण्यात येतील. या  कालावधीत मंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार असून, कोणत्याही भाविकांनी यात्रेसाठी येऊ नये, असे आवाहन  प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.

 कासेगांव ता. पंढरपूर येथील यल्लामा देवी यात्रेच्या अनुषंगाने प्रांत कार्यालयात  देवस्थानचे प्रमुख मानकरी यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली. यावेळी  नायब तहसिलदार एस.पी.तिटकारे,  पोलीस निरिक्षक किरण अवचर, मंडलाधिकारी बाळासाहेब मोरे, यात्रेचे मानकरी वसंतनाना देशमुख, भाऊसाहेब देशमुख, प्रशांत भैय्या देशमुख, विजय देशमुख उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदीर दर्शनासाठी बंद राहणार असा निर्णय याबैठकीत घेण्यात आला असून या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची व ग्रामस्थांची सुरक्षितता महत्वाची असून  ९ आणि ११  जानेवारी या कालावधीत सतर्क रहावे.  या कालावधीत कोणतेही दुकाने, गाडी, लावू देवू नये याची दक्षता घ्यावी. यात्रा कालावधीत मंदीर परिसरात पोलीस बंदोवस्त ठेवण्यात येणार आहे. यात्रेसाठी कासेगांव येथे  भाविक येवू नयेत यासाठी सांगोला रोड चौथा मैल, अनवली चौक, जुना कासेगांव रोड, येथे पोलीस विभागाच्या वतीने बॅरेकेटींग करण्यात येणार आहे. हा निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  भाविकांच्या व ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घेण्यात आला आहे. यात्रा कालावधीत भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये, असे  प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी  यात्रा कालावधीत  शासनाने  दिलेल्या निर्देशाचे काटेकोर पालन करावे. तसेच या कालावधीत कोणतेही वाहन व भाविक दर्शनासाठी येणार नाही दक्षता संबधितांनी घ्यावी अशा सूचनाही प्रांताधिकारी ढोले यांनी यावेळी दिल्या.

 

 

Web Title: Kasegaon trip canceled on the back of Corona; Religious programs will be held in a simple manner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.