काशीपीठाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; जाणून घ्या पुरस्कारार्थींची नावं

By Appasaheb.patil | Published: May 19, 2023 05:36 PM2023-05-19T17:36:44+5:302023-05-19T17:37:22+5:30

सन २०२१ मधील काशीपीठाच्या पुरस्कारांची घोषणा काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी नुकतीच केली.

Kasipeetha state level awards announced Know the names of the awardees | काशीपीठाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; जाणून घ्या पुरस्कारार्थींची नावं

काशीपीठाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; जाणून घ्या पुरस्कारार्थींची नावं

googlenewsNext

सोलापूर : सन २०२१ मधील काशीपीठाच्या पुरस्कारांची घोषणा काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी नुकतीच केली. या पुरस्काराचे वितरण मंगळवार, २३ मे २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर येथे काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृतहस्ते हे पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

यंदाच्या वर्षी डॉ. चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार - शिवलिंग स्वामी - मानखेडकर, लातूर यांना तर वे. मू. वीरसंगय्या स्वामी आदर्श शिक्षक पुरस्कार नवनाथ मूर्किकर, बिदर यांना वे. मू. सदाशिव स्वामी प्रज्ञा पुरस्कार - गंगाधर जोकारे, सोलापूर यांना वे. मू. बंडय्या मठपती समाजसेवा पुरस्कार - नवनीत तोष्णीवाल, सोलापूर यांना विठाबाई देवाप्पा पसारकर कृतज्ञता पुरस्कार - प्रा. भालचंद्र शिंदे, कलबुर्गी यांना ष. ब्र. परंडकर महाराज पत्रकारिता पुरस्कार विक्रम खेलबुडे यांना सिद्रामप्पा (दादा) भोगडे नाट्यकर्मी पुरस्कार - प्रा. रेवणसिद्ध शाबादे, लातूर तर शांताबाई व निवृत्ती गायकवाड कीर्तनकार पुरस्कार - शि.भ.प. मन्मथ महाराज डांगे, नांदेड यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सिद्धय्या स्वामी हिरेमठ, बाबूराव मैंदर्गीकर, डॉ. अनिल सर्जे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेत रेवणसिद्ध वाडकर, राजेंद्र बलसुरे, राजशेखर बुरकुले, चिदानंद मुस्तारे, गुरुशांत रामपुरे उपस्थित होते.

Web Title: Kasipeetha state level awards announced Know the names of the awardees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.