‘कौन बनेगा गावकारभारी’ उत्सूकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:39 AM2021-02-06T04:39:04+5:302021-02-06T04:39:04+5:30
करमाळा तालुक्यात ५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान १५ जानेवारी रोजी होऊन १८ जानेवारी रोजी मतमोजणी झाली. त्यानंतर सरपंचपदाच्या आरक्षणाची लॉटरी ...
करमाळा तालुक्यात ५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान १५ जानेवारी रोजी होऊन १८ जानेवारी रोजी मतमोजणी झाली. त्यानंतर सरपंचपदाच्या आरक्षणाची लॉटरी निघाली. आता सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडीचा मुहूर्त ठरल्याने उत्सुकता वाढली आहे. काठावर बहुमत असलेल्या हिवरवाडी, देवळाली, मांगी, देवीचा माळमध्ये सदस्यांची फोडाफोडी व पळवापळवी होऊ नये म्हणून नवनिर्वाचित सदस्य मंडळींना गोवा, महाबळेश्वर, माथेरान येथे सहलीला नेण्यात आले आहे तर ज्या गावातील सदस्यांचा गावातच मुक्काम आहे त्यांच्यावर गावपुढाऱ्यांना विशेष लक्ष ठेवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
-----
या गावात होणार सरपंच निवडी..
कुंभेज, अर्जुननगर, हिवरवाडी, मांगी, मिरगव्हाण, पाडळी, पांगरे, पांडे, पाथुर्डी, पोटेगाव, सांगवी, सरपडोह, शेलगाव,आळजापुर, बाळेवाडी,देवीचामाळ, गुळसडी, सौंदे, वडगाव, पुनवर, देवळाली, शेटफळ, बोरगाव, बिटरगाव-श्री, पोथरे, घारगाव, हिवरे, निमगाव ह,उमरड, सावडी, मलवडी, भोसे, रोसेवाडी, फिसरे, करंजे, ढोकरी, कविटगाव, जेऊरवाडी,साडे, कोढेंज,सालसे,कुगाव, कोळगाव, जातेगाव, पिंपळवाडी, दिलमेश्वर, झरे, आळसुंदे, नेरले, केडगाव, हिसरे.