बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कविता हाल्लोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:42 AM2021-02-28T04:42:03+5:302021-02-28T04:42:03+5:30

बऱ्हाणपूर : अक्कलकोट तालुक्यातील बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कविता हाल्लोळे, तर उपसरपंचपदी इमामोद्दीन पिरजादे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत ...

Kavita Hallole as Sarpanch of Barhanpur Gram Panchayat | बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कविता हाल्लोळे

बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कविता हाल्लोळे

Next

बऱ्हाणपूर : अक्कलकोट तालुक्यातील बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कविता हाल्लोळे, तर उपसरपंचपदी इमामोद्दीन पिरजादे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत इमामोद्दीन पिरजादे गटाने नऊपैकी पाच सदस्य निवडून आणत एकहाती सत्ता मिळविली आहे. सरपंचपद हे सर्वसामान्य स्त्री संवर्गासाठी असल्याने सरपंचपदी कविता हालोळे यांची वर्णी लागली आहे. बऱ्हाणपूरच्या इतिहासात ग्रामपंचायत स्थापन झाल्यावर १९५२-५८ काळात प्रथमच सरपंचपद हे लिंगायत समाजातील अनंतप्पा नागेशी यांना मिळाले होते. त्यानंतर ६४ वर्षांनी दुसऱ्यांदा पॅनल प्रमुख शहीद पिरजादे यांच्या नेतृत्वाखाली लिंगायत समाजाला सरपंचपदाचा मान मिळाला.

याप्रसंगी अशपाक जहागीरदार, ग्रामपंचायत सदस्य दीपक बनसोडे, अबुन्या मुजावर, मैनोदीन पटेल, इर्शाद फुलारी, गौस पिरजादे, हजरत पटेल, अशरफ पटेल, रशीद पिरजादे, बब्बू पिरजादे, अखतर पिरजादे, बबलू अगसापुरे, चंद्रकांत हालोळे, राजकुमार बनसोडे, गोपीचंद बनसोडे, राम इरवाडकर, निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून जी. एस. घंटे , तलाठी व्ही. एस. पवार, ग्रामसेवक एस.सी. वंगे यांनी काम पाहिले.

यावेळी उपसरपंच इमामोद्दीन पिरजादे, बाबा पटेल, बाशा पिरजादे, डॉक्टर इसाम पिरजादे, सीताराम बनसोडे, अमीर पिरजादे, जफर पिरजादे, खमर पिरजादे, राजकुमार हांडगे, लक्ष्मण इरवाडकर, अझरुद्दीन पिरजादे, पोलीस पाटील मारुती बनसोडे उपस्थित होते.

---

२७ बऱ्हाणपूर

बऱ्हाणपूरच्या सरपंचपदी कविता हाल्लोळे, तर उपसरपंचपदी इमामोद्दीन पिरजादे यांची निवड झाली. यावेळी नूतन गावकारभाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Kavita Hallole as Sarpanch of Barhanpur Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.