आश्वासन पाळा, अन्यथा सरकार पडेल, मनाेज जरांगे-पाटील यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 13:38 IST2024-08-09T13:37:17+5:302024-08-09T13:38:13+5:30
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात बुधवारी जरांगे-पाटील यांची जाहीर सभा झाली. यानंतर ते विजापूर राेडवर उद्याेगपती प्रमाेद साठे यांच्या बंगल्यात मुक्कामी हाेते.

आश्वासन पाळा, अन्यथा सरकार पडेल, मनाेज जरांगे-पाटील यांचा इशारा
साेलापूर : राज्य सरकारने मराठ्यांना दिलेले आश्वासन पाळले पाहिजे, अन्यथा हे सरकार पडणार, असा इशारा मराठा आरक्षण आंदाेलनाचे नेते मनाेज जरांगे-पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात बुधवारी जरांगे-पाटील यांची जाहीर सभा झाली. यानंतर ते विजापूर राेडवर उद्याेगपती प्रमाेद साठे यांच्या बंगल्यात मुक्कामी हाेते. गुरुवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जरांगे-पाटील म्हणाले, मला बदनाम करण्याचे सरकारचे षड्यंत्र सुरू आहे. शांतता रॅलीत काहीतरी घडू शकते. आम्हाला दिलेले आश्वासन सरकारने पाळले पाहिजे. सरकार आमचे ऐकत नाही. ते केवळ भुजबळ यांचे ऐकत आहे. याचे परिणाम फडणवीस यांना भाेगावे लागतील.
आमदार प्रसाद लाड यांच्याकडून जरांगे-पाटलांवर टीका सुरू आहे. यावर ते म्हणाले, तुमच्यात एवढीच हिंमत आहे. आम्हाला बाेलण्यापेक्षा फडणवीसांना आरक्षण द्यायला सांगा. दुसऱ्याचे घर कशाला दाखवता.