"केजरीवाल यांनी शरद पवारांबद्दल असे शब्द वापरले होते, ते मी बोलू शकत नाही!"
By संताजी शिंदे | Published: May 25, 2023 06:27 PM2023-05-25T18:27:08+5:302023-05-25T18:27:26+5:30
नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास आहे, ते आता वैश्विक नेते झाले आहेत, फडणवीस यांचं वक्तव्य.
सोलापूर : अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वी शरद पवार यांच्या बद्दल असे असे शब्द वापरले होते, ते मी माझ्या तोंडून बोलू शकत नाही. उद्धव ठाकरे यांच्या बद्दलही वक्तव्य केले होते. केवळ नरेंद्र मोदी यांना विरोध म्हणून ही मंडळी आता एक येत आहे. मात्र नरेंद्र मोदी यांच्यावर लोकांचा विश्वास असून, ते आता वैश्विक नेते झाले आहेत असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरूवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आले असता, नुतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शरद पवार यांचीही ते भेट घेत आहेत, असे असले तरी हा सर्व प्रपंच नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठी सुरू आहे. एकेकाळी याच अरविंद केजरीवाल यांनी शरद पवारांबद्दल असे शब्द वापरले होते की ते मी बोलू शकत नाही. उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टिका केली होती. तेव्हांचे व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत. मात्र काही झाल तर नरेंद्र मोदी यांच्यावर लोकांचा विश्वास आहे.
नरेंद्र मोदी हे जेव्हां पापुवा न्यू गीनी, फिजी या देशात गेले होते तेव्हां तेथील सरकारने त्यांना सर्वोच्च सन्मानाने गौरव केला आहे. आफ्रीकेच्या पंतप्रधानांनी त्यांना बॉस म्हणून गौरवीले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी तुमचा कार्यक्रम घ्यायचा म्हंटले की कोणा कोणाला पास द्यायचा असा प्रश्न आम्हाला पडतो. जपाननेही अशाचा भावना व्यक्त केल्या होत्या. एकंदरीत परदेशांमध्ये नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढली आहे. ते वैश्वीक नेते झाले आहेत, जगासमोर भरताची प्रतीमा वेगळी झाली आहे असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.