मोडनिंबमध्ये मोकाट फिरणाऱ्यांची केली कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:17 AM2021-06-04T04:17:54+5:302021-06-04T04:17:54+5:30
बुधवारी सकाळी दहा वाजता आरोग्य विभाग मोडनिंब, महसूल विभाग मोडनिंब, ग्रामपंचायत मोडनिंब व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे सर्व भाजी ...
बुधवारी सकाळी दहा वाजता आरोग्य विभाग मोडनिंब, महसूल विभाग मोडनिंब, ग्रामपंचायत मोडनिंब व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे सर्व भाजी विक्रेत्या व्यापाऱ्यांची कोरोना रॅपिड टेस्ट केली. विशेषतः त्यामध्ये एकही व्यापारी पॉझिटिव्ह आला नाही. तसेच पान आळी येथील दुकानदारांच्या टेस्ट दुकानात जाऊन केल्या. त्याही सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या.
त्यानंतर सर्व टीमने दत्त चौक येथे नाकेबंदी करून बिनकामी फिरणाऱ्या नागरिकांच्या टेस्ट घेतल्या. दत्त चौकात दोन नागरिक पॉझिटिव्ह सापडले. त्यांना उपळाई येथे रवाना केले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शिंदे, प्रदीप व्यवहारे, तलाठी राऊत, उपसरपंच दत्ता सुर्वे, ग्रामसेवक विजय काटकर, सरपंच प्रतिनिधी अनिल शिंदे, कैलास तोडकरी, सोमा माळी, सहाय्यक फौजदार भोसले, आतार उपस्थित होते. एकूण ८० चाचण्या केल्या, पैकी दोन व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या.
---
०२ माेडनिंब
मोडनिंब बाजारपेठेत मोकाट फिरणाऱ्यांची अँटिजन चाचणी करताना.