केसर, पायरी, दसेरी, बदाम आंब्यांचा सोलापुरात तोरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 05:03 PM2019-05-03T17:03:04+5:302019-05-03T17:05:33+5:30
मंगळवारी अक्षयतृतीया : देवगढ हापूस, केसर हापूसला पसंती
सोलापूर : डाळींब आणि ऊसाचे सर्वाधिक क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाºया सोलापूरमध्ये अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर केसर, पायरी, दसेरी आणि बदाम आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. या आंब्यांचा तोरा वाढला असून खवय्येगिरीत पुढे असणाºया सोलापूरकरांनीही चांगलीच पसंती दिली आहे.
मंगळवारी सर्वत्र अक्षयतृतीया साजरी होत असून या पार्श्वभूमीवर यंदाही गुजरात, वलसाड, चाकूर आणि जुनागढमधून केसर आंबा दाखल झाला आहे़ याबरोबरच रत्नागिरीतून पायरी दाखल झाला आहे़ विशेषत: लखनौमधून दसेरी आंबा आला आहे, याशिवाय हैदराबादहून बदाम आणि बेईनशा अशा दोन प्रकारचे आंबे दाखल झाले आहेत. बदाम आणि बेईनशा आंब्यांची आवक बाजारात जास्त प्रमाणात आहे. काही लोक आंब्यांच्या तयार रसाला पसंती दिली आहे. बाजारात आंबे अनेक प्रकारचे अनेक प्रांतातून दाखल झाले असून मुबलक उपलब्धतेमुळे यंदा दर स्थिर आहेत.
सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ट्रकमधून माल मोठ्याप्रमाणात दाखल होतोय़ यामुळे यंदा आडत व्यापाºयांपुढे मुबलक उपलब्ध झालेला आंबा बाजारात संपवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत़ अक्षयतृतीयपूर्वीच याची खरेदी-विक्री वाढली आहे़ तसेच काही दिवसात यांचे दरही उतरण्याची शक्यता व्यवसायिकांनी वर्तलवली आहे़ यंदा वादळी ाºयाचे प्रमाणही कमी असल्याने कच्चा आंबा बाजारात कमी आहे.
आंध्रमधील हिमायतचे प्रथमच आगमन
यंदा बाजारात प्रथमच ‘हिमायत’ नावाचा आंबा दाखल झाला आहे़ तो आंध्रप्रदेशातून दाखल झाला आहे़ अल्पावधीत सोलापूरकरांच्या जीभेवर त्याने साखरेप्रमाणे गोढी वाढवली आहे़ विशेषता याचा दर हा १६० रुपये किलो आहे़ त्यामुळे सर्वच वर्गातील नागरिक ांकडून या आंब्याला मागणी आहे़ यापूर्वी हा आंबा सोलापुरकरांना माहीत नव्हता़ काही लोक खाऊन झाल्यानंतर खासकरुन या आंब्यांच्या कोयी राखून ठेवताहेत आणि घरामधील कुंडीत लावण्याचा प्रयत्न करताहेत़
लक्ष्मी मार्केटमधील
शुक्रवारचे दर
केसर (१०० ते १४०)
रत्नागिरी पायरी (१५० ते ३००)
लालबाग (६० ते ८०)
देवगढ हापूस / रत्नागिरी हापूस (३०० ते ८००)
दसेरी आंबा (८९ ते १६०)
बदाम (४० ते ८०)
बेईनशा (४० ते ८०)
हिमायत (१६०)
यंदा आंब्याला मागणीही खूप आहे आणि आवकही मुबलक आहे़ जिल्ह्यात सर्वच माल हा जवळच्या बाजार समितीतून नव्हे तर खुल्या बाजारातून वा सरळ उत्पादक शेतकºयांकडून आयात केला जातोय़ यंदा विशेषत: आंध्रमधून दाखल झालेल्या हिमायत नावाच्या आंब्याला मागणी सर्वाधिक आहे़ पुणे आणि मंबईतील काही नातेवाईकांना हा आंबा सोलापूरकरांनी पाठवला आहे़
- फरिद शेख
फळ विके्रते