खाकी वर्दीकडून जोपासला जातोय कायद्याबरोबर प्राणीमित्राचा छंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 07:50 PM2019-11-09T19:50:44+5:302019-11-09T19:52:44+5:30

नातेपुते पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल भगत यांची यशोगाथा: जखमी प्राण्यांवर उपचार करीत बजावतात आपली ड्यूटी

The khaki uniforms are being protected by the hobby | खाकी वर्दीकडून जोपासला जातोय कायद्याबरोबर प्राणीमित्राचा छंद

खाकी वर्दीकडून जोपासला जातोय कायद्याबरोबर प्राणीमित्राचा छंद

Next
ठळक मुद्दे मूळचे वेळापूर येथील अमोल भगत यांना  लहानपणापासूनच सर्प व प्राणी या विषयीची अगळी उत्सुकताबीड येथे नोकरी बजावल्यानंतर नुकतीच त्यांची नातेपुते येथे बदली झाली आत्तापर्यत त्यांनी वेगवेगळ्या जातीच्या सुमारे ४ हजार सर्पांना त्यांनी पकडून जंगलात सोडून दिले

एल. डी. वाघमोडे 

माळशिरस : हॅलो...आमच्या गल्लीत चोर घुसलेत, अपघात झाला आहे. असा फोन येणे पोलिसांना  नवीन नाही. फोन येताच पोलीस मदतीला पोहोचतात देखील; मात्र हॅलो ... साहेब आमच्या गल्लीत, घरात मोठा साप आलाय या फोन आला की नातेपुुते पोलीस स्टेशनचे पो.कॉ. अमोल भगत हे तत्काळ धावून जातात.

 सापांच्या विविध जाती, त्याच्याविषयी समज-गैरसमज, श्रद्वा व  अंधश्रद्वा याविषयी जागृती व जखमी प्राण्यांवर उपचार अविरतपणे करीत आपली ड्यूटी बजावत  आहेत.

 मूळचे वेळापूर येथील अमोल भगत यांना  लहानपणापासूनच सर्प व प्राणी या विषयीची अगळी उत्सुकता होती. लहानपणी गवती साप पकडला व सोडला. त्यावेळेपासून त्यांना छंद जडला, पुढे त्यांनी २०१०  साली पोलीस खात्यात नोकरी सुरु केली. बीड येथे नोकरी बजावल्यानंतर नुकतीच त्यांची नातेपुते येथे बदली झाली आहे. आत्तापर्यत त्यांनी वेगवेगळ्या जातीच्या सुमारे ४ हजार सर्पांना त्यांनी पकडून जंगलात सोडून दिले आहे. तर वेगवेगळ्या कारणाने जखमी झालेल्या  हरीण, काळविट, उद मांजर, मोर, माकड अशा वेगवेगळ्या प्राण्यांवर उपचार करून त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात सोडले आहे.

सापाच्या बाबतीत समाजात असणाºया अंधश्रद्धा बाबतीत जागृती करून साप हा निसर्गचक्राचा कसा महत्त्वाचा घटक आहे, ते भगत पटवून देतात.  एकदा नाग पकडून सोडायला जात असताना ते स्वत: पडले व नाग सुटला. त्याने फणा त्यांच्या तोंडासमोर उगारला; मात्र त्यांनी श्वास रोखून धरत हालचाल केली नाही. थोड्या वेळाने त्याने फणा खाली घेतला व निघून गेला. अशा अनेक रोमहर्षक प्रसंगांना तोंड देत छंद जोपासणारे भगत हे  सार्वजनिक ठिकाणी फलक लावून जागृतीचे काम करीत आहेत. 

प्राण्यांचे संरक्षण, संगोपन करावे
- निसर्गचक्रातील प्राण्याचे संरक्षण करावे तसेच साप घराजवळ आढळल्यास त्यास इजा करू नका किंवा माहिती नसताना निष्काळजीपणे पकडण्याचा प्रयत्न करू नका. याबाबतच्या अंधश्रद्धा जाणून घेऊन शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून सर्व प्राणी व सर्पाबरोबर मित्रत्वाचे नाते जोपासणे गरजेचे असल्याचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल भगत यांनी सांगितले.

Web Title: The khaki uniforms are being protected by the hobby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.